भारतीय क्रिकेट संघाने टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिंबाबव्वे विरुद्ध टी 20 मालिकेत 4-1 फरकाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या युवा संघाने ही मोहिम फत्ते केली. त्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी उत्सुक आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय अशा 2 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 27 जुलेपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याबाबतची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. आता बीसीसीआय निवड समिती टीम इंडिया स्क्वाड केव्हा जाहीर करणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समिती या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी 16 जुलै रोजी होणार आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 टी20I आणि 3 वनडे अशा एकूण 6 सामने खेळणार आहे. टी 20 आणि वनडे दोन्ही मालिकांसाठी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. तसेच केएल राहुल याचंही वनडे सीरिजसाठी कॅप्टन म्हणून नाव आघाडीवर आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना टी 20I निवृत्तीनंतर वनडे सीरिजमधून विश्रांती दिली जाऊ शकते.
टी 20 मालिका
पहिला सामना, 27 जुलै
दुसरा सामना, 28 जुलै
तिसरा सामना, 30 जुलै
वनडे सीरिज
पहिली मॅच, 2 ऑगस्ट
दुसरी मॅच, 4 ऑगस्ट
तिसरी मॅच, 7 ऑगस्ट
उभयसंघातील टी 20 आणि वनडे या दोन्ही मालिका 2 ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. टी 20 सीरिजमधील तिन्ही सामने हे पल्लेकेले येथे आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजेपासून सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना कोलंबोत दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
टी 20 सीरिजसाठी संभावित टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.
वनडे सीरिजसाठी संभावित टीम इंडिया: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, मुकश कुमार आणि अर्शदीप सिंह.