मुंबई | बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज रविवारी 26 मार्च रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या ऑलराउंडर खेळडूचं प्रमोशन झालं आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला मोठा फायदा झाला आहे. जडेजा याचा समावेश आता थेट A+ कॅटेगरीत करण्यात आला आहे. त्यामुळे जडेजाचं वार्षिक वेतनातही घशघशीत वाढ होणार आहे. जडेजा हा A+ कॅटेगरीत स्थान मिळवणारा टीम इंडियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. या A+ कॅटेगरीत कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली यॉर्कर किंग यांचा आधीपासून समावेश आहे. आता या चौघांना वार्षिक 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
बीसीसीआय दरवर्षी वार्षिक करार जाहीर करते. या करारात A+, A, B आणि C अशा एकूण 4 श्रेणी असतात. बीसीसीआय खेळाडूच्या कामगिरीचं मूल्यमापन करुन संबंधित खेळाडूचा योग्यतेनुसार त्या त्या गटात श्रेणीत समावेश केला जातो. तसेच श्रेणीनुसार वार्षिक वेतन ठरतं. बीसीसीआय A+ श्रेणीतील खेळाडूला 7 कोटी, A+ श्रेणीतील खेळाडूला 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूला 3 आणि C श्रेणीतील खेळाडूला 1 कोटी देतं. यंदाही या क्रमानेचस ही रक्कम ठरवण्यात आली आहे. ही वार्षिक पगारवाढ ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. थोडक्यात काय तर टीम इंडियाच्या खेळाडूंना ही वाढ ऑक्टोबर 2022 लागू होणार आहे.
बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर
NEWS ?- BCCI announces annual player retainership 2022-23 – Team India (Senior Men).
More details here – https://t.co/kjK4KxoDdK #TeamIndia
— BCCI (@BCCI) March 26, 2023
बीसीसआयच्या या यादीतील ए प्लस श्रेणीत 4, ए श्रेणीत 5, बी श्रेणीत 6 तर सी श्रेणीत 11 खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या A+ प्लस श्रेणीत आधी 3 खेळाडू होते, त्यात आता एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याचा समावेश A+ प्लस श्रेणीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या श्रेणीत कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा असे 4 खेळाडू आहेत.
तसेच A श्रेणीत हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे खेळाडू आहेत. तर बी कॅटेगरीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.
तर C श्रेणीत सर्वाधिक 11 खेळाडू आहेत. यात उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत यांचा समावेश आहे.