मुंबई | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध खेळतेय. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियात 1 बदल करण्यात आलाय. आर अश्विन याच्या जागेवर शार्दुल ठाकुर याला संधी देण्यात आली. तर आजारी असलेल्या शुबमन गिल याच्यामुळे ईशान किशन याला दुसऱ्या सामन्यातही फ्लॉप कामगिरीनंतर कायम ठेवण्यात आलंय. टीम इंडियाचा पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियासाठी अफगाणिस्तान विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान टीम इंडियासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा शुबमन गिल याच्या आरोग्याबाबत अपडेट समोर आली आहे. शुबमन गिल हा डेंग्युतून सावरतोय. शुबमन गिल आता अहमदाबादला पोहचणार आहे. शुबमनला डेंग्युमुळे पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळता आलं नाही. शुबमनला डेंग्युची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काही तासांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
शुबमन गिल याची तब्येत ठीक आहे. शुबमन अहमदाबादला जाण्यासाठी तयार आहे. शुबमन गुरुवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावात सामील होणार की नाही, याबाबत काही निश्चित नाही. मात्र शुबमनची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारलीय. मात्र शुबमन पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही, हे अजून नक्की नाही”, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील तिसरा सामना हा सर्वात मोठा आहे. 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिआचा हा विजयी आलेख कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.