Indian Cricket Team | टीम इंडियासाठी गूड न्यूज, स्टार बॅट्समनची लवकरच एन्ट्री!

| Updated on: Jul 18, 2023 | 2:36 AM

Team India | टीम इंडियासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

Indian Cricket Team | टीम इंडियासाठी गूड न्यूज, स्टार बॅट्समनची लवकरच एन्ट्री!
Follow us on

मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 5 जुलैपासून सुरुवात झाली. टीम इंडियाने कसोटी मालिकेपासून विंडिज दौऱ्याची सुरुवात केली. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत विंडिजवर 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. टीम इंडिया दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वर्ल्ड कप खेळणार आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा जखमी वाघ लवकरच परतणार आहे.

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर आहे. केएलला विंडिज दौऱ्यातही दुखापतीमुळे मुकावं लागलं. केएल दुखापतीतून सावरुन टीममध्ये कमबॅकसाठी बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जोरदार सराव करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल कसून सराव करतोय. तसेच केएल आयर्लंड दौऱ्यात कमबॅक करु शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मोठी दिलासाजनक बातमी आहे.

आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत

केएल राहुल याला आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे केएल याला उर्वरित 16 व्या मोसमातून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे कृणाल पंड्या याला लखनऊ सुपर जायंट्स टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केएलला ही दुखापत चांगलीच महागात पडली. या दुखापतीमुळे केएलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला मुकावं लागलं. इतकंच नाही, तर वेस्ट इंडिज दौऱ्यातही केएलला राहुलची दुखापतीमुळे निवड करण्यात आली नाही.

केएल याच्यावर दुखापतीनंतर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर केएल एनसीएत जोरदार सराव करतोय. तर दुसऱ्या बाजूला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर हे दोघेही दुखापतीतून सावरतायेत. त्यामुळे केएलसह श्रेयस आणि बुमराह या तिघांची आशिया कप आणि आयर्लंड दौऱ्यासाठी निवड होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केएल राहुल याची आंतराराष्ट्रीय कारकीर्द

दरम्यान केएलने आतापर्यंत टीम इंडियाकडून 54 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलंय. या 54 सामन्यात केएलने 5 शतकांसह 1 हजार 986 धावा केल्या आहेत. केएलने 47 कसोटी सामन्यांमध्ये 33.44 च्या सरासरीने 2 हजार 642 धावा केल्या आहेत. केएलने या दरम्यान 13 अर्धशतक आणि 7 शतक ठोकले आहेक. तर 72 टी 20 मॅचमध्ये 2 हजार 265 रन्स केल्या आहेत.