मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा सूर्यकुमार यादव दुखापती झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. सूर्यकुमार यादव आता उपचार घेत असून तो अफगाणिस्तानविरूद्धची मालिकेतही तो दिसणार नाही. अशातच सूर्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमधील सूर्याला अशा अवस्थेत पाहून चाहते चिंतेत पडलेत.
सूर्याला फिल्डिंग करताना पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. सूर्याने इन्स्टावर व्हिडीओ शेअर केला आहे. दुखापत कधीही चांगली नसते, मी माझ्या पद्धतीने लवकरात लवकर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आशा करतो की तुम्ही लोक सुट्टीचा आनंद घेत असाल. प्रत्येक दिवसात लहान आनंद शोधा, असं सूर्याने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हार्दिक पंड्या दुखापती झाला होता त्यानंतर सूर्यकुमार याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत अपडेट आली आहे की, हार्दिकसुद्धा अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत खेळणार नसल्याची माहिती समजत आहे.
दरम्यान, येत्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप 2024 असून टीम इंडियासाठी दोन्ही खेळाडू महत्त्वाचे आहेत. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांची दुखापत वर्ल्ड कप आधी बरी व्हायला हवी. संघासाठी दोन्ही मोठे खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी हुकमी खेळाडू असून त्याचं फिट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.