Team India: सूर्यकुमार यादवचं भारतात पोहचताच खास ट्विट, म्हणाला….

| Updated on: Jul 04, 2024 | 8:53 AM

Team India Suryakumar Yadav: टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर नवी दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवने एक पोस्ट केली आहे.

Team India: सूर्यकुमार यादवचं भारतात पोहचताच खास ट्विट, म्हणाला....
axar patel and suryakumar yadav
Image Credit source: suryakumar yadav x account
Follow us on

टीम इंडियाने 29 जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध बारबाडोस येथे अंतिम सामन्यात 7 धावांनी विजय मिळवून टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर टीम इंडिया 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर बारबाडोसहून नवी दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना झाली. टीम इंडिया 15 तासांच्या प्रवासानंतर 4 जुलै रोजी सकाळी सव्वा 6 च्या आसपास नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाली. टीम इंडियाच्या खेळाडू त्यानंतर व्हीआयपी गेटमधून बसमध्ये पोहचली. त्यानंतर काही मिनिटांच्या प्रवासानंतर आयटीसी मोर्या हॉटेलमध्ये पोहचली.आता टीम इंडियाचे खेळाडू या हॉटेलमध्ये फ्रेश होऊन नाश्ता करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे.

टीम इंडिया त्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मुंबईत ओपन डेकबसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने या विजयी मिरवणुकीसाठी खास ट्विट केलं आहे. सूर्याने कॅप्टन रोहित शर्मांचं ट्विट रिट्विट करत 2 शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सूक आहेत. तसंच मुंबईकर सूर्यकुमारही आपल्या शहरात जाण्यासाठी उत्सूक आहे. रोहितने बुधवारी 3 जुलैला भारतीय चाहत्यांना मुंबईत होणाऱ्या विजयी मिरवणुकीसाठी आमंत्रित करणारं ट्विट केलं होतं. सूर्याने हेच ट्विट रिट्विट करत “See You All” असं म्हणत काही इमोजी पोस्ट केल्या आहेत.

सूर्याचा गेमचेंजिग कॅच

दरम्यान सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप फायनलमध्ये गेमचेजिंग कॅच घेतला. दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचा पाठलाग करताना 20 व्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलरने जोरदार फटका मारला होता. मात्र सूर्यकुमार यादवने बाउंड्री लाईनवर रिले कॅच घेतला. या कॅचने सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला.

सूर्याकडून रोहितचं ट्विट रिट्विट

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.