IND vs SL : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली थोडक्यात बचावला, फायनलआधी मैदानातील तो व्हिडीओ समोर

| Updated on: Sep 17, 2023 | 1:10 PM

Virat Kohli Viral Video : भारताचा किंग कोहली इतका घाबरला ते पाहून आता चाहते त्याची मजा घेत आहे. कोहलीचा हा व्हिडीओ नेमका कोणत्या सामन्यामधील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

IND vs SL : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली थोडक्यात बचावला, फायनलआधी मैदानातील तो व्हिडीओ समोर
Follow us on

मुंबई : भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट कोहली मैदानात असताना त्याच्यासोबत एक घटना घडली. स्वत: विराट कोहली दचकला, आशिया कपच्या फायनल सामन्याआधी विराटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भारताचा किंग कोहली इतका घाबरला ते पाहून आता चाहते त्याची मजा घेत आहे. कोहलीचा हा व्हिडीओ नेमका कोणत्या सामन्यामधील आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

पाहा व्हिडीओ- :

 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की ग्राऊंडमन सुपर सोवर घेऊन येत होता त्यावेळी कोहलीचं लक्ष काही नव्हतं. तितक्यात कोहलीचं लक्ष गेलं आणि तो दचकला, मैदानात आपल्या करामतींमुळे कायम चर्चेत असलेला कोहलीचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

बांगलादेशविरूद्धच्य सामन्यामध्ये विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्या सामन्यात विराट कोहली मैदानात ड्रिंक्स घेऊन येताना कोहलीने केलेल्या डान्सचाही  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलच नाहीतर जगभर ट्रेंड झाला होता. आज होणाऱ्या फायनल सामन्यामध्ये विराट कोहली याच्याकडूव भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

आशिया कप 2023 मध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये दिसलाय. सुपर 4 राऊंडमध्ये पाकिस्तान संघाविरूद्ध कोहलीने दमदार शतक केलं होतं. विराटने 122 धावांची नाबाद खेळी करत 350 धावांचा टप्पा संघाला पार करून दिला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेवर एकतर्फी माफ केली होती.

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसीध कृष्ण.