Suryakumar Yadav | भर पावसात ‘सूर्य’कुमार चमकला, विंडिज विरुद्ध सिक्स ठोकत खणखणीत अर्धशतक

| Updated on: Aug 13, 2023 | 9:56 PM

Suryakumar Yadav Fifty | टीम इंडियाचे एका बाजूला विकेट जात असताना सूर्यकुमार यादव याने विंडिज विरुद्ध नेहमीच्या अंदाजात खणखणीत अर्धशतक ठोकलं.

Suryakumar Yadav | भर पावसात सूर्यकुमार चमकला, विंडिज विरुद्ध सिक्स ठोकत खणखणीत अर्धशतक
सूर्यकुमार यादव याने एका डावामध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत. सूर्याने तीन नंबरला येत 117 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि 6 सिक्सर मारले आहेत.
Follow us on

फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र चौथ्या सामन्याप्रमाणे या अंतिम सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या सलामी जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. या सलामी जोडीने टीम इंडियाचाी निराशा केली. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल हे दोघेही 3 ओव्हरच्या आतच आऊट झाले. यशस्वीने 5 आणि शुबननने 9 धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानी आला. सूर्याने तिलक वर्मा याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. यानंतर तिलक वर्मा टीम इंडियाचा स्कोअर 66 धावा असताना आऊट झाला.

तिलक वर्मा याने 18 बॉलमध्ये 27 धावा केल्या. तिलकला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. संजूला या मालिकेत संधी मिळाली. संजूला या सामन्यात हिरो ठरण्याची संधी होती. मात्र संजूने पुन्हा निराशा केली. संजू 13 धावा करुन माघारी परतला.

हे सुद्धा वाचा

सूर्यकुमार यादव याचं 15 वं अर्धशतक


एका बाजूला विकेट जात होते. तर दुसऱ्या बाजूला सूर्या अधूनमधून फटके मारत होता. सूर्याने एका बाजूने आक्रमण सुरुच ठेवलं होतं. संजूनंतर कॅप्टन हार्दिक मैदानात आला. सूर्या आणि हार्दिक या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सूर्याने फटकेबाजी सुरुच ठेवली. सूर्याने 16 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने अवघ्या 38 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने हे अर्धशतक ठोकलं. सूर्याच्या टी 20 कारकीर्दीतील हे 15 वं आणि या मालिकेतील दुसरं अर्धशतक ठरलं. विशेष म्हणजे पाऊस पडत असताना सूर्याने ही अर्धशतकी खेळी.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन आणि अल्झारी जोसेफ.