T20 World Cup: सूर्याची कॅप्टन रोहितसाठी खास पोस्ट, फार मोठी गोष्ट बोलून गेला

| Updated on: Jul 01, 2024 | 10:31 PM

Suryakumar Yadav On Rohit Sharma: टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियासाठी ही कामगिरी केली. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने रोहितसाठी खास पोस्ट केली आहे.

T20 World Cup: सूर्याची कॅप्टन रोहितसाठी खास पोस्ट, फार मोठी गोष्ट बोलून गेला
Rohit sharma and suryakumar yadav
Follow us on

भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात मात करुन आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. कोणत्याच संघाला टीम इंडियाला पराभूत करणं जमलं नाही. टीम इंडियाने साखळीतील 3 सुपर 8 मधील 3, सेमी फायनल आणि फायनल असे एकूण सलग 8 सामने जिंकले. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा 50 वा टी20i विजय ठरला. टीम इंडियाने 2007 नंतर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर साऱ्या देशात आनंदाची लाट पसरली. 2007 नंतर रोहित असा कॅप्टन ठरला ज्याने भारताला आपल्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकून दिली.

टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहितचं साऱ्याच स्तरातून कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही, तर टीम इंडियातील सहकाऱ्यांनीही रोहितचं भरभरुन कौतुक केलं. रोहितचा लाडका आणि मुंबईकर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सूर्याने या पोस्टमध्ये साऱ्या भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सूर्याने या पोस्टबाबत काय म्हणालाय हे जाणून घेऊयात.

सूर्या काय म्हणाला?

“कॅप्टन रोहित, हे सर्व कसं केल जातं हे दाखवण्यासाठी धन्यवाद. सर्वात भारी”, असं म्हणत सूर्याने रोहितचं जाहीर अभिनंदन केलंय. सूर्याने साऱ्या भारतीयांच्या भावना या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत. सूर्याचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

सूर्याचा गेमचेंजिग कॅच

दरम्यान सूर्याने दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने असलेला सामना एक कॅच घेत टीम इंडियाच्या बाजूने झुकवला. दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. तेव्हा डेव्हिड मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या बॉलवर मोठा फटका मारला. मिलरने मारलेला फटका हा सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर बॅलन्स करत घेतला. सूर्याने कॅच घेतला त्यानंतर तोल गेल्याने बॉल बाहेर फेकला आणि बाउंड्री लाईनच्या आत गेला. त्यानंतर तोल सावरत आत आला आणि कॅच पूर्ण केला.

सूर्याची सोशल मीडिया पोस्ट

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी अशी होती टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.