मुंबईतील विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप विजयी संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचा जयघोष करण्यात आला.
विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात टीम इंडियातील या चारही खेळाडूंनी आपलं मनोगत आणि भावना व्यक्त केल्या. यावेळेस कॅप्टन रोहितने सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर घेतलेल्या कॅचबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली. “हे यश काही आमच्या चौघांचं नाही, साऱ्या टीम इंडियाचं आहे. बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला आम्ही बसवला असता”, असं म्हणत रोहितने मिश्किल टोला लगावला. रोहितच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकला. सूर्याने मनोगत व्यक्त करताना त्या ऐतिहासिक कॅचबाबत व्यक्त झाला. “कॅच हातात बसला”, असं सूर्या म्हणाला. यावर बोलताना रोहितने ही प्रतिक्रिया दिली.
“तुम्हा सर्वांना माझा मोठा नमस्कार. सीएम साहेब तुमचे धन्यवाद आम्हाला इथे बोलावलंत. तुम्हा सर्वांना येथे पाहून बरं वाटलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की याआधी कधीच असा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे असं सर्व पाहून आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवलाय, हे पाहून मला आनंद झाला”, असं रोहितने म्हटलं. तसेच रोहितने मुंबईत 4 जुलै रोजी नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीसाठी मुंबईकर क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. रोहितने या चाहत्यांचे आभार मानले.
“आम्ही काल जे मुंबईत पाहिलं ते आमच्यासाठी स्वप्नवत होतं. वर्ल्ड कप आणायचा हे स्वप्न होतं. आम्ही या वर्ल्ड कपसाठी 11 वर्ष थांबलो होतो. आपण 2013 साली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकलो होतो. मी सर्वांचा सहकाऱ्यांचा आभारी आहे, कारण हा वर्ल्ड कप विजय आम्हा चौघांमुळे (सूर्यकुमार, यशस्वी आणि शिव) नाही, तर सर्व खेळाडूंमुळे झाला आहे.मी भाग्यवान आहे कमी मला तोडीसतोड खेळाडू मिळाले. वेगवेगळ्या सामन्यात प्रत्येक खेळाडूने हात वर करुन जबाबदारी घेतली आणि जिंकवलं”, असंही रोहितने नमूद केलं.
यानंतर रोहितने सूर्याच्या कॅचचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली. “सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, ते बर झालं की बसला, नाहीतर मी पुढे त्याला बसवलं असतं”, असं रोहित मस्करीत म्हणाला. यानंतर उपस्थित सारेच खळखळून हसू लागले.
रोहित शर्मा काय म्हणाला?
#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men’s cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV
— ANI (@ANI) July 5, 2024
टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.