बिजिंग | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडवर 9 विकेट्सने विजय मिळवला. तर टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा रविवारी 8 ऑक्टोबर रोजी आहे. हा सामना चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या युवा फलंदाजाने धमाका केलाय. या युवा फलंदाजांना 6 बॉलमध्ये 6 सिक्स खेचत क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या फलंदाजांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय. तो फलंदाज कोण आहे आणि कोणत्या टीम विरुद्ध त्याने ही कामगिरी केलीय हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाची बी टीम एशियन गेम्समध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात खेळतेय. टीम इंडियाने सेमी फायनल सामना बांगलादेश विरुद्ध खेळला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं 97 धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केलं. यशस्वी जयस्वाल हा झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर कॅप्टन ऋतुराज आणि तिलक वर्मा या दोघांनी टीम इंडियाला विजयी केलं.
टीम इंडियाकडून तिलक वर्मा याने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 55 रन्स केल्या. तिलकने या दरम्यान 6 सिक्स आणि 2 चौकार ठोकले. तिलकने 211 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. तर ऋतुराजने नाबाद 40 धावा केल्या. आता टीम इंडिया अफगाणिनस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात भिडणार आहे.
तिलक वर्मा
For ma, who brings me out of tough phases, who’s always stood by me and is my biggest motivation ❤️🤗
— Tilak Varma (@TilakV9) October 6, 2023
बांग्लादेश प्लेईंग इलेव्हन | सैफ हसन (कॅप्टन), परवेझ हुसैन इमॉन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, अफिफ हुसैन, शहादत हुसेन, जाकेर अली (विकेटकीपर), रकीबुल हसन, हसन मुराद, मृत्युंजॉय चौधरी आणि रिपन मंडोल,
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर आणि अर्शदीप सिंग.