नवी दिल्ली : Ind vs WI 3rd T20I सामन्यात मंगळवारी दिवसाची सुरुवात टीम इंडिया संघाच्या (Team India) पराभवाच्या बातमीनं सुरू झाली. मात्र, बुधवारची सकाळ वेस्ट इंडिजच्या (Ind vs WI) पराभवाची आणि टीम इंडियाच्या विजयाची बातमी घेऊन आली आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचं कौतुक होऊ लागलं, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर (Social Media) पोस्टचा वर्षाव सुरू केला. टीम इंडियानं 24 तासांत वेस्ट इंडिजविरुद्ध बदला घेतला. परिस्थिती तशीच होती. टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजच्या टीमनं गुडघे टेकवले असा हा सामना झाला. यासह पाचव्या टी-20 सामन्याच्या सीरिजमध्ये टी इंडियानं पुन्हा एकदा 2-1ची आगेकुच केली आहे. भारतानं दुसरा टी 20I हा पाच विकेटनं पराभूत झाल्याच्या 24 घंट्यानंतर तीसरा T-20I सामना सात विकेटनं जिकला. पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघानं विजय खेचून आणला आहे.
तिसऱ्या T20I मध्ये भारतानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं हे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना म्हणजे 19व्या षटकातच 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. आता विजयाची ती 3 कारणे पाहूया जी भारतीय संघाचे 3 चेहरे आहेत.
रोहित शर्माच्या निवृत्त दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवनं भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये तो यशस्वी ठरला. त्यानं संघाला ती गती दिली, त्यामुळे उर्वरित फलंदाजांचे काम सोपे झाले. सूर्यकुमार यादवनं 44 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावा केल्या.
This elegant knock from @surya_14kumar won India the game. Spectacular batting!
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/Z7XHntlaFS
— FanCode (@FanCode) August 2, 2022
सूर्यकुमार यादवनं चांगली सुरुवात केली, तर ऋषभ पंतनं नाबाद खेळीनं शेवटपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. पंतनं 26 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 33 धावा केल्या.
.@RishabhPant17 ends the chase in the 19th over. A magnificent four from the batter!
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/Plrwm0743B
— FanCode (@FanCode) August 2, 2022
भारताच्या विजयात भुवीची भूमिकाही नाकारता येणार नाही. त्यानं 4 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले. यातील एक विकेट धोकादायक काईल मायर्सची होती. ज्याने 73 धावा केल्या. दुसरी विकेट कॅरेबियन कर्णधार निकोलस पूरनची होती, जर तो विकेटवर थांबला असता तर तो मोठा धोका बनू शकतो. पण भुवीने लवकरच त्याचे पाय उपटले. आणि भारताला विजयासाठी एकूण 170 पेक्षा कमी धावा होत्या.
टीम इंडियाच्या विजयानं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पोस्टचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. भारताच्या विजयाच्या या पोस्ट होत्या. 24 तासांत भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव घेतला आणि पुन्हा एकदा यशोशिखरावर जाऊन बसल्याचं बोललं जातं होतं.