मेन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडियाही ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला 5 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी वूमन्स टीम इंडियात अचानक एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
यास्तिका भाटीया हीला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळता येणार नाहीय. यास्तिका भाटीया हीला मनगटाच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे यास्तिकाच्या जागी उमा चेत्री हीचा समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर असलेल्या उमा चेत्री हीने आतापर्यंत टीम इंडियाचं 4 टी 20I सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. उमाने या 4 सामन्यांमध्ये फक्त 9 धावा केल्या आहेत. उमाला पहिल्या 4 सामन्यांमध्ये काही खास करता आलेलं नाही. मात्र आता उमाचा यास्तिकाच्या अनुपस्थितीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमाला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तिचं एकदिवसीय पदार्पण होईल.
पहिला सामना, 5 डिसेंबर, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 8 डिसेंबर, ब्रिस्बेन
तिसरा सामना, 11 डिसेंबर, पर्थ
उमा चेत्रीचा टीम इंडियात समावेश
Injury concerns in India camp as replacement player called up ahead of Australia ODIs 🏏#AUSvINDhttps://t.co/hK6li9tclw
— ICC (@ICC) November 27, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तितास साधू, उमा चेत्री (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर आणि सायमा ठाकोर.