मुंबई : भारताचा वर्ल्ड कप 2023 मधील भारतीय संघाचा पाचवा सामना न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना हिमाचलमधील धर्मशाला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर पार पडणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. सलग चार विजयानंतर पाचव्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. मात्र दुसरीकडे न्यूझीलंड संघाचंही तगडं आव्हान भारतासमोर असणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला तर 20 वर्षांचा पडलेला दुष्काळ संपवणार आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्युझीलंड संघ आतापर्यंत 9 वेळा आमने सामने आले आहेत. यामधील पाच सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने तर भारताने 3 सामने जिंकले आहेत तर यामधील एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने न्यूझीलंडविरूद्ध 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना जिंकला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत भारताने एकदाही किवींना पराभूत केलं नाही. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत वर्ल्ड कपबाहेर केलं होतं.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 ला धर्मशाळामध्ये शेवटचा सामना झाला होता. भारताने हा सामना जिंकला होता, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या, अवघ्या 40 ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी किंवींना गुंडाळलं होतं. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 34 ओव्हरमध्ये चार विकेट गमावत हा सामना खिशात घातला होता.
दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांमध्ये 116 वन डे सामने झाले आहेत. यामधील 58 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंड संघाने 50 सामने जिंकले असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत तर एक सामना बरोबरीत सुटला होता. मात्र वर्ल्ड कपमधील दुष्काळ भारतीय संघाला संपवावा लागणार आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा (C, हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्य कुमार यादव.