मुंबई : टीम इंडिय आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या टेस्टला अवघे दोन दिवस बाकी आहेत. सेंच्युरियनमध्ये हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहेत. यामध्ये विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा हा पहिलाच सामना असणार आहे. या कसोटी सामन्यासाठी माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाची प्लेइंग 11 निवडली आहे.
सेंच्युरियनमधील टेस्टमध्ये सर्वांचं लक्ष टीम इंडिया प्लेइंग 11 कडे लागलेलं असणार आहे . दोन स्पिनर्सला खेळवणार की कोणा एकाला खाली बसवणार? प्लेइंंग 11 मध्ये आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांपैकी कोणाला जागा द्यायची? टीम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान असणार आहे. खेळपट्टी पाहायला गेली तर वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल असं मानलं जात आहे. गावसकर यांनी या टेस्टसाठी जो संघ निवडला आहे त्यामध्ये पाहा कोणाला संधी दिली आहे जाणून घ्या.
सुनील गावसकर यांनी निवडलेल्या संघात के एल राहुल याला विकेट कीपर म्हणून घेतलं आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज यांना स्थान दिलं आहे. तर दोन्ही स्पिनर्सला खेळवण्यात यावं असं त्यांना वाटत आहे. मात्र प्लेइंग 11 मध्ये गावसकर यांनी शार्दूल ठाकूर याला वगळलं आहे. मात्र तसं पाहायला गेलं तर पहिल्या कसोटी सामन्यात शार्दुलची निवड होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
The challenge for Indian batters, the role of Ro-Ko, Playing XI combination & much more, listen to the Little Master’s opinion on how #TeamIndia should approach the boxing day test vs #SouthAfrica.
Tune-in to the 1st #SAvIND Test
TUE, DEC 26, 12:30 PM | Star Sports Network pic.twitter.com/YjgcySM0YE— Star Sports (@StarSportsIndia) December 23, 2023
पहिल्या कसोटी सामन्यासाठी सुनील गावसकरांनी निवडलेला संघ:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. .