मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. दोन सामन्यांची मालिका असून टीम इंडियाने आफ्रिकेमध्ये कसोटी मालिाका जिंकली नाही. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत. प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा याने एका खेळाडूची कमी जाणवणार असल्याचं म्हटलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद शमी याची कमी जाणवणार, युवा खेळाडू त्याची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र शमीने गेल्या काही वर्षांमध्ये कमाल कामगिरी केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी गेल्या 5 ते 7 वर्षांत परदेशात चांगली कामगिरी केल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.
आमच्याकडे सिराज आणि बुमराहही आहेत, फक्त स्विंग बॉलर हवाय की सीम बॉलर हवाय हे बघायचं आहे. याच विषयावर आम्ही चर्चा करत आहोत. पण खेळपट्टी पाहून आम्ही यावर निर्णय घेणार होतो. पण हवामानामुळे आम्हाला विकेट पाहता आली नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं.
Test Match Mode 🔛#TeamIndia batters are geared up for the Boxing Day Test 😎#SAvIND pic.twitter.com/Mvkvet6Ed9
— BCCI (@BCCI) December 25, 2023
फलंदाजी करताना तुम्ही 100 किंवा 70-80 धावांवर खेळत असाल तरीपण तुम्ही सेट झाला असं होऊ शकत नाही. इंग्लंडमध्येही अशीच परिस्थिती असते. तुमची ताकद काय आहे हे खेळाडूंनी समजून घेतलं पाहिजे, आता खेळलेल्या खेळाडूंनी अनुभव शेअर केल्याचं रोहितने सांगितलं.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC). ), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).