मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी खूप काही घडलं, दोन्ही संघ एकदा ऑल आऊट झाले. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या तीन विकेट गेल्या आहेत. पिचवरून असं वाटतं की दुसरी कसोटी दुसऱ्याच दिवशी संपेल. कारण वेगवान गोलंदाजांना पिचवर मदत मिळत आहे. टीम इंडियाकडे आणखीन 36 धावांची आवश्यकता आहे. आजचा सामना एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टपेक्षा काही कमी नव्हता. आफ्रिका 55 तर एकवेळ टीम इंडिया 153 वर चार विकेटवर होती. त्यानंतर 13 बॉलमध्ये सगळं काही बदललं आणि टीम इंडिया ऑल आऊट झाली. यावर माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
2024 मधील क्रिकेटची सुरूवात एका दिवसात 23 विकेट पडून होते. अविश्वसनीय साऊथ आफ्रिका ऑल आऊट झाल्यावर मी फ्लाईटमध्ये चढलो होतो. घरी आलो आणि टीव्ही पाहतो तर काय आफ्रिकेने 3 विकेट गमावल्या होत्या. मी नेमकं काय मिस केलं, असं सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Cricket in ‘24 begins with 23 wickets falling in a single day.
Unreal!
Boarded a flight when South Africa was all out, and now that I’m home, the TV shows South Africa has lost 3 wickets.
What did I miss?#SAvIND— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 3, 2024
पहिल्या सेशनमध्येच आफ्रिकेचा संघ 55 धावांवर ऑल आऊट झाला होता. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक सहा तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाने चांगली सुरूवात केली होती. टी-ब्रेकपर्यंत चार विकेट पडल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा के.एल. राहुल आऊट झाल्यावर पत्त्यांच्या बंगल्यासारख्या विकेट पडल्या. आफ्रिका संघ परत फलंदाजी करायला उतरल्यावरही त्यांच्या तीन विकेट गेल्या. मुकेश कुमार याने दोन तर बुमराहने एक विकेट घेतली आहे.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार