टीम इंडियाला 2024 वर्षाचा शेवट अपेक्षेनुसार करता आला नाही. टीम इंडियाला सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने यासह इतिहास बदलला. ऑस्ट्रेलियाने मायदेशात 2014-2015 नंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली आणि 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने या मालिकेसह बरंच काही गमावलं. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आणि गेल्या 2 वर्षांची मेहनत व्यर्थ ठरली. आता मात्र टीम इंडिया या हा पराभव विसरुन नववर्षात दणक्यात सुरुवात करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.
टीम इंडिया नववर्षात एकाच संघाविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिका मायदेशात होणार आहेत. इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघातील टी 20i मालिकेत 5 सामने होणार आहेत. तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादव टी 20i सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा एकदिवसीय संघाची धुरा सांभाळणार आहे. बीसीसीआय निवड समिती या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा पुढील काही दिवसांमध्ये घोषणा करणं अपेक्षित आहे. तर दुसर्या बाजूला इंग्लंडने दोन्ही मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 22 जानेवारीला संघ जाहीर केला. जॉस बटलर
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
पहिला सामना, गुरुवार 6 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना, रविवार 9 फेब्रुवारी, कटक
तिसरा सामना, बुधवार 12 फेब्रुवारी, अहमदाबाद
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.