मुंबई | प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत कॅप्टन रोहित शर्मा याने युवा शिलेदारांना सोबत घेत इंग्लंडचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवत मालिका जिंकली. इंग्लंडने विजयी सलामी देत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पाठी वळून पाहिलं नाही. टीम इंडियाने एक एक करत सलग चार सामने जिंकले. टीम इंडियाने या मालिकेसह आयसीसी टेस्ट रँकिंगमधील अव्वल स्थान मिळवलं. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. आता टीम इंडिया पुढील कसोटी मालिका कुणा विरुद्ध आणि कधी खेळणार हे आपण जाणून घेऊयात.
आता 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होत आहे. या 17 व्या मोसमाची सांगता ही मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर 1 ते 29 जून दरम्यान टी 20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया थेट 1 महिन्यानंतर अर्थात सप्टेंबर महिन्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाला अशाप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत एकूण 3 मालिका खेळायच्या आहेत.
टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1
Number 1 ranked Test team – India
Number 1 ranked ODI team – India
Number 1 ranked T20I team – India
Number 1 ranked WTC team – IndiaThe Dominance of Indian team under Rohit Sharma 🇮🇳🤯 pic.twitter.com/aq8tTeUVLy
— Johns. (@CricCrazyJohns) March 10, 2024
टीम इंडिया नंबर 1
टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीत आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय. तसेच विजयी टक्केवारीही वाढवलीय. तर आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्येही टीम इंडियाने पहिलं स्थान मिळवलंय. टीम इंडियाने आतापर्यंत डब्ल्यूटीसी 2023-2025 मध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत. या 9 पैकी टीम इंडियाने 6 सामने जिंकलेत. तर 2 सामने गमवावे लागले. तर 1 सामना हा अनिर्णित राहिला. टीम इंडियाच्या नावावर 6 विजयासह 74 पॉइंट्स आहेत.