IND vs SA 2nd Test | दुसऱ्या कसोटीमध्ये आफ्रिकेला चीतपट केल्यावर रोहित म्हणाला ‘हे’ खेळाडू खरे विजयाचे शिलेदार

| Updated on: Jan 04, 2024 | 6:11 PM

IND vs SA 2nd Test | टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सात विकेटने रोहित अँड कंपनीने विजय मिळवला आहे. सामन्यानंतर बोलताना कॅप्टन रोहित शर्मा याने या खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं.

IND vs SA 2nd Test | दुसऱ्या कसोटीमध्ये आफ्रिकेला चीतपट केल्यावर रोहित म्हणाला हे खेळाडू खरे विजयाचे शिलेदार
IND vs SA 2nd Test Rohit Sharma
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने यजमानांना सात विकेटने पराभूत केलं आहे. दोन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. केप टाऊनच्या मैदानावर टीम इंडियाने पहिल्यांदा कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या मानहानिकारक परभवानंतर टीम इंडियाच्या वाघांनी दमदार कमबॅक केलं. दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा याने पाहा कोणाला श्रेय दिलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

सेंच्युरियनमध्ये झालेल्या पराभवामधून आम्ही धडा घेतला. आम्ही चांगलं कमबॅक केलंच पण खासकरून गोलंदाजांनी कमबॅक केलं. काही प्लॅन केले होते त्याचा फायदा गोलंदाजांना झाला. 100 धावांची आघाडी मिळवण्यासाठी आम्ही आधी चांगली फलंदाजी केली. फक्त शेवटच्या सहा विकेट गेल्या त्याने वाईट वाटलं. आम्हाला माहित होतं की हा छोटा सामना असणार आहे. त्यामुळे आघाडी मिळवणं महत्त्वाचं होतं. आम्ही बेसिक गोष्टी केल्या बाकी काम पिचने केलं. या सामन्याचं सिराज, बुमराह, मुकेश आणि प्रसिद्ध कृष्णा यांना विजयाचं अधिक श्रेय असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेचा संघ 55 धावांवर ऑल आऊट झाला होता. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करताना 153 धावा केल्या. त्यानंतर आघाडी घेतलेल्या टीम इंडियाने आफ्रिकेला दुसऱ्या डावात 176 वर ऑल आऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 79 धांवाची गरज असताना तीन विकेट गमावत या लक्ष्याचा पाठलाग केला.

 

दोन्ही संगांची प्लेइंग 11

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार