Yashasvi Jaiswal | द्विशतकानंतर यशस्वीला आयसीसीकडून रिटर्न गिफ्ट

| Updated on: Feb 07, 2024 | 6:10 PM

Yashasvi Jaiswal | यशस्वी जयस्वाल याला इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक करुनही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला नाही. मात्र त्यानंतर आयसीसीने यशस्वीला मोठी गुड न्यूज दिली आहे.

Yashasvi Jaiswal | द्विशतकानंतर यशस्वीला आयसीसीकडून रिटर्न गिफ्ट
Follow us on

मुंबई | यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक केलं. यशस्वीने विशाखापट्टणममध्ये 209 धावांची खेळी केली. यशस्वीच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आता द्विशतक केल्यानंतर यशस्वीला आयसीसीकडून रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. यशस्वीला आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. यशस्वीने या रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. यशस्वीने 37 स्थानांची झेप घेतली आहे. यशस्वी यासह 29 व्या क्रमांकावर पोहचला आहे. यशस्वी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करत आहे. यशस्वीने हैदराबादमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 74 बॉलमध्ये 80 धावांची खेळी केली. यशस्वीने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले होते. तर दुसऱ्या डावात मात्र त्याला 15 धावाच करता आल्या. तर दुसऱ्या कसोटीत यशस्वीने इंग्लंड विरुद्ध 290 चेंडूत 19 चौकार आणि 7 षटकारांसह 209 धावा ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

यशस्वीने अशाप्रकारे पहिल्या 2 सामन्यातील 4 डावांमध्ये 80.25 च्या सरासरीने एकूण 321 धावा केल्या आहेत. यशस्वीने या जोरवर आयसीसी टेस्ट बॅट्समन रँकिंगमध्ये उलटफेर केला. यशस्वी दुसऱ्या कसोटीआधी 74 व्या स्थानी होता. मात्र द्विशतकानंतर तो थेट 29 व्या क्रमांकावर पोहचला आहे.

यशस्वीची आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप

जसप्रीत बुमराह नंबर 1

दरम्यान आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराह याने आर अश्विन याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. बुमराह यासह टी 20, वनडेनंतर कसोटी क्रमवारीत नंबर स्थान मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. बुमराहने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहला याचाच फायदा रँकिंगमध्ये झाला.