Jasprit Bumrah Injury | जसप्रीत बुमराह सर्जरीसाठी न्यूझीलंड इथे दाखल, World Cup ला मुकणार!

| Updated on: Mar 05, 2023 | 4:38 PM

टीम इंडियाला आतापर्यंत या खेळाडूने एकट्याच्या जीवावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र आता या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे.

Jasprit Bumrah Injury | जसप्रीत बुमराह सर्जरीसाठी न्यूझीलंड इथे दाखल, World Cup ला मुकणार!
Follow us on

मुंबई | टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रासला आहे. या दुखापतीमुळे बुमराहला टी 20 वर्ल्ड कपसारख्या महत्वाच्या स्पर्धेला मुकावं लागलं. बुमराहला तेव्हापासून टीममधून बाहेर आहे. बुमराह या दुखापतीतून सावरण्यासाठी झगडतोय. मात्र त्याची दुखापत बरी होत नाहीये. आता बुमराह न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. बुमराहच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, डॉ रोवन शाउटन यांच्या निगराणीखाली शस्त्रक्रिया पार पडणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी बुमराह हॉस्पिटलमध्ये 2 दिवस आधी दाखल होणार आहे.

बुमराह वनडे वर्ल्ड कपमधून आऊट?

बुमराह टीम इंडियाच्या बॉलिंग ग्रुपचा हेड आहे. बुमराह टीममूधन बाहेर असल्याने आतापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय. मात्र जर आता बुमराह आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून आऊट झाला, तर तो टीमसाठी मोठा झटका असेल. इतकंच नाही, तर भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत बुमराह खेळू शकेल का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, हे अजूनही निश्चित नाही. बुमराहला पूर्णपणे आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी 4 आठवडे लागू शकतात. त्यानंतर बुमराहला रिहॅबसाठी 3-5 महिन्यांचा वेळ लागू शकतो.

हे सुद्धा वाचा

“बुमराह कधी कमबॅक करणार ही तारीख निश्चित करणं हे या क्षणासाठी अवघड आहे. बुमराहवर शस्त्रक्रिया पार पडेल. त्यानंतर तो रिहॅबसाठी जाईल. रिहॅब संपल्यानंतरच आम्हाला कळेल की बुमराह केव्हापर्यंत कमबॅक करु शकतो”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिली.

बुमराह क्रिकेटपासून दूर

बुमराह अखेरचा सामना हा सप्टेंबर 2022 मध्ये खेळला होता. हा टी 20 सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आला होता. तेव्हापासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. बुमराहला 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. तेव्हापासून बुमराहला आशिया कप आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप या महत्वाच्या स्पर्धेत खेळता आलं नव्हतं.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना हा 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात वनडे सीरिज होणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.