मुंबई | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजवर टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला. त्यानंतर आता उभयसंघात 27 जुलैपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील सलामीच्या सामन्यात विंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांचं आव्हान दिलं. या 115 धावांच्या आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियासाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही गूड न्यूज दिली आहे. जय शाह यांच्या घोषणेसह टीम इंडियाच्या ताकद एकाच झटक्यात दुप्पटीने वाढली आहे.
टीम इंडियाचा हुकमाचा एक्का यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा पूर्णपणे फीट झाला आहे. बुमराह दुखापतीतून पूर्णपणे फीट झाला आहे. याबाबतची माहिती जय शाह यांनी दिलीय. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात सर्वच आनंदीआनंद पाहायला मिळतोय. तर प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरली आहे.
टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. जस्प्रीत बुमराह हा पूर्णपणे फीट आहे. तो आयर्लंड दौऱ्यात खेळू शकतो, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली. आयर्लंड दौऱ्यासाठी अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसात संघ जाहीर होऊ शकतो.
जसप्रीत बुमराह याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्यानंतर बुमराहच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला तो अनेक महिने न परतण्यासाठीच.
बुमराहला ही दुखापत चांगलीच महागात पडली. बुमराहला आशिया कप स्पर्धेला मुकावं लागलं. त्यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कमबॅक केलं. मात्र बुमराहला खेळवण्याचा निर्णय धाडसी ठरला. बुमराहला पुन्हा वेदना होऊ लागल्या.
बुमराहने आपल्या दुखापतीवर आणि कमबॅकसाठी एनसीएत मेहनत घ्यायची तयारी सुरु केली. बुमराहची जानेवारी 2023 महिन्यातील श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा निवड करण्यात आली. मात्र बुमराहला पुन्हा दुखापतीचा त्रास जाणवू लागला. दुखापतीमुळे बुमराहला आयपीएल 16 व्या मोसमाला मुकावं लागलं. बुमराहत्या पाठीवर शस्त्रक्रिया पार पडली.
त्यानंतर बुमराहने एनसीएत सराव सुरु केला. बुमराह दररोज ठराविक ओव्हर टाकत असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर अखेर काही दिवसांनी बीसीसीआयने श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या दुखापतीबाबत अपडेट दिले होते. त्या अपडेटनुसार बुमराह लवकरच दुखापतीतून 100 टक्के फिट झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर अखरे आज 27 जुलै रोजी जय शाह यांनी बुमराह पूर्णपणे फीट असल्याचं जाहीर केलं.