‘वर्ल्ड कप मी जिंकवलेला नसून…’; विधानसभेत ‘या’ एका वाक्याने रोहितची हवा, पाहा काय म्हणाला

| Updated on: Jul 05, 2024 | 9:38 PM

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही आपली छाप पाडली. रोहितने आपल्या भाषणावेळी बोललेल्या एका वाक्यानंतर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

वर्ल्ड कप मी जिंकवलेला नसून...; विधानसभेत या एका वाक्याने रोहितची हवा, पाहा काय म्हणाला
Follow us on

विधानसभेच्या विधीमंडळात वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियामधील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील चार खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने 1 कोटी बक्षीस देत सत्कार केला. यावेळी सभागृहामध्ये सर्व खेळाडूंची भाषणे झालीत. जेव्हा रोहित भाषणासाठी गेला तेव्हा चाहत्यांनी ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर रोहितनेही आपल्या भाषणामध्ये सर्वांचे आभार मानले आणि एक वाक्य असं काही बोलला ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सगळ्यांना माझा नमस्कार, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असा कार्यक्रम कधी सभागृहात झाला नाही. आम्हाला आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी झाला. वर्ल्ड कप भारतात आणायचा आमच्यासह सर्वांचं हेच स्वप्न होतं. 11 वर्ष आम्ही या वर्ल्ड कपसाठी थांबलो, शेवटी आम्ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. पण हे जे काही झालं ते माझ्या एकट्यामुळे किंला सूर्या, दुबे किंवा जयस्वालमुळे नाहीतर सगळ्या खेळाडूंमुळे हे शक्य झालं. मी खूप लकी आहे कारण मला मिळालेली सर्व टीम मजबूत होती. वेगवेगळ्या मॅचमध्ये प्रत्येकाने जबाबदारी घेऊन संघासाठी चांगली कामगिरी केल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

रोहितच्या भाषणामध्ये जर सूर्याने तो कॅच नसता घेतला तर काय केलं असतं हे सांगितलं. रोहित म्हणाला, सूर्याने आता बोलला की त्याच्या हातात बॉल बसला पण बर झालं बॉल बसला नाहीतर मी पूढे त्याला मी बसवलं असतं, रोहित शर्मा असं बोलताच सभागृहात सर्वजण हसू लागले. रोहितकडून सर्व राजकारण्यांनी एक गोष्ट शिकून घेतली पाहिजे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

 

पत्रकार परिषदेमध्ये कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजमधून उत्तर कसं देता येतं हे रोहितकडून शिकता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची यादी आहे ज्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होत नाही त्या यादीत आता रोहितचं नाव गेल्याचं फडणवीसांनी सांगितलं.