टीम इंडियाचा चॅम्पियन खेळाडू युवराज सिंह याचे वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. योगराज सिंह यांनी वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव आणि महेंद्र सिंह धोनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. मी माझ्या आयुष्यात धोनीला कधीच माफ करणार नाही, त्याने स्वत:चं तोंड आरशामध्ये पाहिलं पाहिजे. कपिल देवचे अशी वेळ आणणार की जग त्याच्यावर थुंकेल, असं योगराज सिंह म्हणाले होते. या वक्तव्यानंतर धोनी आणि कपिल देवचे चाहते योगराज सिंह यांना ट्रोल करत आहेत. अशातच सोशल मीडियवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोशल माडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये युवराज सिंह आपल्या वडिलांबाबत बोलत असलेला दिसत आहे. युवराजे मागील काही दिवसांपूर्वी एत मुलाखत दिली होती. त्यामध्ये तो त्याचे वडील योगराज सिंह यांच्याबाबत बोलताना, माझ्या वडिलांना मेंटल इशू असून ते कधीच मान्य करणार नाहीत, असं युवराज सिंह बोलत आहे. युवराजने रणवीर अल्लाहबादिया याच्यासोबतच्या पॉडकास्टचा आहे.
याआधी योगराज सिंह यांनी गंभीरवर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. महेंद्र सिंह धोनी 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये हटकून संथ गतीने खेळत होता. धोनीच्या अशा खेळीने इतर खेळाडू प्रेशरमध्ये आले आणि विकेट गेल्या. धोनीला सेमी फायनल सामना जिंकवायचाच नव्हता, असं योगराज सिंह म्हणाले होते. त्यावेळी या विधानाची क्रिकेट विश्वात चर्चा झाली होती.
My Father has mental issues : Yuvraj #MSDhoni pic.twitter.com/KpSSd4vDzA
— Chakri Dhoni (@ChakriDhonii) September 2, 2024
युवराज सिंह याने टीम इंडियाकडून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहा बॉलवर सहा सिक्स मारणारा युवराज सर्वांच्याच आठवणीत आहेत. टीम इंडियाने टी-20 मध्ये जिंकलेला पहिला वर्ल्ड कप त्यानंतर वन डे वर्ल्ड कप 2011 मध्येही त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. युवराजला त्यावेळी कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र त्याने कडवी झुंज दिली आणि परत एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. टीम इंडियासाठी युवराजने 40 कसोटींमध्ये 1900 धावा, 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8701 धावा आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1177 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये युवराज सिंहने 17 शतके केली आहेत.