Ind vs Aus : दुसऱ्या कसोटीमध्ये ‘या’ गोलंदाजाने सिक्सर मारत मोडला माहीचा विक्रम

| Updated on: Feb 26, 2023 | 6:42 PM

न्युझीलंडच्या फलंदाजांची नांगी टाकलेली दिसली. 209 धावांवर पहिला डाव गुंंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं. या खेळीने भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.

Ind vs Aus : दुसऱ्या कसोटीमध्ये या गोलंदाजाने सिक्सर मारत मोडला माहीचा विक्रम
Follow us on

NZ vs ENG Test Match : भारत आणि ऑस्ट्रलियामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेमध्ये आता 2-0 ने टीम इंडियाकडे आघाडी आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि इंग्लड यांच्यातही दुसरा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडने पहिल्या डावात फंलदाजी करताना 435 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र न्युझीलंडच्या फलंदाजांची नांगी टाकलेली दिसली. 209 धावांवर पहिला डाव गुंंडाळण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं. 209 धावांमध्ये कर्णधार टीम साऊथीने सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्या या खेळीने भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे.

टीम साऊथीने 73 धावांच्या खेळीमध्ये 6 षटकार आणि 5 सिक्सर मारले. साऊथीने 8 षटाकारांसह कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या 78 षटकारांचा विक्रमस मोडला आहे. साऊथीने अवघ्या 13 डावांमध्ये 82 षटकार मारत माहीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. इतकंच नाहीतर साऊथी न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. माजी खेळाडू डॅनियल व्हिटोरीच्य 696 विकेट्स मागे टाकत त्याने 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, सामन्याची आताची स्थिती पाहिली तर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने सामन्याच्या पहिल्या सत्रापासून आघाडी कायम ठेवली आहे. संघाने न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिलेली नाही. न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात 209 धावांवर ऑलआऊट झाला.

यामध्ये ब्रॉडने स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 बळी घेतले तर जॅक लीच आणि अँडरसनने 3-3 बळी घेतले. आजच्या दिवसाचा खेळ संपला पहिल्या डावात ऑलआऊट झाल्यानंतर इंग्लंडने फॉलॉऑन दिलं आहे. त्यानंकर किंवांनी 3 गडी गमावत 202 धावा केल्या आहेत. आता हेनरी निकोलस नाबाद 7 आणि केन विलियमसन नाबाद 25 धावांवार आहे.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (W), मायकेल ब्रेसवेल, टिम साउथी (C), मॅट हेन्री, नील वॅगनर

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (C), बेन फोक्स (W), ऑली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन