धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 15 वा सामना हा पावसामुळे 43 ओव्हरचा खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स या सामन्यात आमनेसामने होते. नेदरलँड्सने तगड्या मात्र चोकर्स दक्षिण आफ्रिका टीमवर 38 धावांनी विजय मिळवत मोठा उलटफेर केला. नेदरलँड्सने विजयासाठी दिलेल्या 246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका टीमला 42.5 ओव्हरमध्ये 207 धावांवर गुंडाळलं. नेदरलँड्सचा हा 16 वर्षांनंतर वर्ल्ड कपमधील पहिला विजय ठरला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सलग दुसऱ्यांदा उलटफेर केला.
नेदरलँड्सने याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उलटफेर केला होता. नेदरलँड्सने तेव्हा 13 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कप 2022 मधून बाहेर केलं होतं. तेव्हाही टेम्बा बावुमा याच्याच नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टीमला उलटेफर पाहावा लागला होता. आताही वर्ल्ड कपमध्ये टेम्बा बावुमा हाच कर्णधार आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 38 धावांनी चितपट केल्यानंतर कॅप्टन टेम्बाला मोठा झटका लागला आहे. टेम्बाला 24 तासांच्या आतच मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे.
आयसीसीने वनडे रँकिंग जारी केली आहे. बॅट्समन रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम अव्वल स्थानी कायम आहे. तर टीम इंडियाचा शुबमन गिल यानेही दुसरं स्थान कायम राखलंय. तर टेम्बाला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. टेम्बा रँकिंगमध्ये 14 व्या क्रमांकावरुन थेट 16 व्या स्थानी घसरला आहे.तर एडन मारक्रम यालाही चार स्थानांचं नुकसान झालं आहे.
टेम्बा बावुमा याला रँकिंगमध्ये
Big movement at the top of the @MRFWorldwide ODI Player Rankings for a host of @cricketworldcup stars 💥#CWC23https://t.co/oK31QUOz75
— ICC (@ICC) October 18, 2023
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.