मुंबई : वर्ल्ड कप 2023 नंतर आता आयपीएलची लगबग सुरू झाल्याचं दिसत आहे. हार्दिक पंड्या मुंबईत परतल्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे देण्यात आली आहे. कमी वयात गिलकडे मोठी जबाबदारी आली असून त्याने व्यवस्थित सांभाळली तर भविष्यात याचा मोठा फायद होऊ शकतो. अशातच क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही एका युवा खेळाडूकडे कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेशचा युवा नजमुल हुसेन शांतो आहे. आजपासून सुरू झालेल्या बांगलदेश आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यामध्ये नजमुल हुसेन शांतो कॅप्टन आहे. याआधी शांतोने कसोटामध्ये कर्णदारपदाची भूमिका निभावली नाही. आताच झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये शांता याने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. या दोन कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशचे मोठे खेळाडू शाकिब अल हसन, लिटन दास हे खेळत नाहीयेत.
Dutch-Bangla Bank Test Series 2023
Bangladesh 🆚 New Zealand 🏏1stTest | November 28, 2023 | Venue: SICS, Sylhet | Time: 09:30 AM (BST)
Full Match Details: https://t.co/T3QHK95rOi
Watch the Match Live on Gazi TV, T-Sports & Rabbithole#BCB | #Cricket | #BANvNZ pic.twitter.com/kEXzxkAttd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 27, 2023
शांतोने आपल्या नेतृत्त्वाखाली चांगली कामगिरी केली तर बांगलादेश टीम मॅनेजमेंट त्याला कर्णधार म्हणून पाहू शकतं. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये बांगलादेशने अवघा एक सामना जिंकला आहे. त्यामुळे युवा कर्णधारासाठी मोठी संधी असणार आहे.
टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, केन विलियम्सन, विल यू. .
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, खालिद अहमद, शहादत हुसैन, हसन मुराद. , नईम हसन, झाकीर हसन.