मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये सध्या गुजरात टायटन्स (GT) चांगलाच फॉर्ममध्ये दिसतोय. या सामन्यात अनेक खेळाडू वाखण्याजोगी कामगिरी करातायेत. काही खेळाडू अगदीच अपेक्षित नसल्यासारखं खेळताना दिसून येताय. मुंबई इंडियन्सचं (MI) देखील तसंच उदाहरण देता येईल. या संघातील खेळाडुंनी काल विजयाचं खातं उघडलंय. मात्र, या संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी निराशाजनक आहे. आयपीएलमध्ये असे अनेकवेळा घडले आहे की, एखाद्या हंगामात खेळाडू अतिषय चांगली कमगिरी करतो आणि पुढच्या हंगामात तो खराब खेळतो. काही खेळाडू फक्त एकाच हंगामासाठी जातात. त्यानंतर त्यांची कारकीर्द संपते. स्वप्नील अस्नोडकर ते पॉल वलथाटीपर्यंत ‘वन सीझन वंडर्स’ झाले आहेत. काही खेळाडू आयपीएल 2021 मध्ये देखील स्टार बनले. परंतु चालू हंगामात 44 सामने पूर्ण होईपर्यंत काही खेळाडू अपयशी ठरले आहेत. आपण अशाच पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
ऋतुराज गायकवाड : चेन्नईचा हा सलामीवीर गेल्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा होता. ऋतुराज या मोसमातही संघर्ष करत आहे. त्याने आठ सामन्यांत 17.25 च्या सरासरीने 138 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 117.95 आहे. गेल्या मोसमात ऋतुराजने 45.35 च्या सरासरीने 635 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 136.26 इतका होता. ऋतुराजने एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली होती. चेन्नईने त्याला सहा कोटींमध्ये कायम ठेवले.
व्यंकटेश अय्यर : मध्य प्रदेशातील या खेळाडूला कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सलामीसाठी पाठवले होते. व्यंकटेश या मालिकेत बऱ्यापैकी यशस्वी ठरला. गोलंदाजीतही त्याने चांगली कामगिरी केली. व्यंकटेशने 10 सामन्यात 370 धावा केल्या होत्या. गोलंदाजीतही तीन विकेट्स होत्या. व्यंकटेशला या मोसमात आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. त्याला कोलकाताने 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. व्यंकटेशने या मोसमातील नऊ सामन्यांमध्ये 16.50 च्या सरासरीने केवळ 132 धावा केल्या आहेत. त्याला गोलंदाजीत यश मिळालेले नाही.
शार्दुल ठाकूर : चेन्नईकडून तीन हंगामात खेळलेल्या शार्दुल ठाकूरला यावेळी दिल्लीने 10.75 कोटींना खरेदी केले. शार्दुलने गेल्या मोसमात 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या. यावेळी त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्याने नऊ सामन्यांत फक्त पाच विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल महागातही ठरला आहे. त्याने 9.74 च्या इकॉनॉमी रेटने धावा स्वीकारल्या आहेत.
चेतन साकारिया : राजस्थान रॉयल्ससाठी गेल्या मोसमात धोकादायक गोलंदाजी करणाऱ्या साकारियाला चालू हंगामात फारशी संधी मिळालेली नाही. साकारियाने 14 सामन्यांत 14 बळी घेतले. त्याने 8.19 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. यंदाच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले. मोसमाच्या पूर्वार्धात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. साकारियाला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि तो फक्त एक विकेट घेऊ शकला.
वरुण चक्रवर्ती : कोलकाता नाईट रायडर्सने या खेळाडूला 2020 मध्ये चार कोटी रुपयांना खरेदी केले होते. वरुणने 2020 मध्ये 17 आणि 2021 मध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर त्याला टीम इंडियातही संधी देण्यात आली, मात्र वरुण तिथे फ्लॉप ठरला. कोलकाताने यावेळी त्याला 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. आयपीएलच्या चालू हंगामात वरुणची कामगिरी चांगली राहिलेली नाही. त्याने आठ सामन्यांत फक्त चार विकेट्स घेतल्या आहेत