Smriti Mandhana | स्मृती मंधाना हीचा तडाखा, द हंड्रेडमध्ये वादळी खेळी

| Updated on: Aug 04, 2023 | 11:28 PM

The Hundred Smriti Mandhana | सांगलीकर स्मृती मंधाना हीने परदेशात आपल्या बॅटिंगने इंगा दाखवत गोलंदाजांना चांगलाच झोडून काढला.

Smriti Mandhana | स्मृती मंधाना हीचा तडाखा, द हंड्रेडमध्ये वादळी खेळी
Follow us on

साऊथम्पटन | द हंड्रेड वूमन्स क्रिकेट स्पर्धेत सांगलीकर स्मृती मंधाना हीने तडाखेदार बॅटिंग करत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. सदर्न ब्रेव्ह टीमसाठी खेळताना स्मृतीने वेल्श फायर वूमन्स विरुद्ध तडाखेबंद बॅटिंग केली. ओपनिंगला आलेली स्मृती शेवटपर्यंत नाबाद राहिली. स्मृतीने शेवटपर्यंत मैदानात राहत झंझावाती खेळी केली. वेल्श फायर वूमन्स सदर्न ब्रेव्हच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली.

सदर्न ब्रेव्हच्या सलामी जोडीची शानदार सुरुवात

स्मृती आणि डॅनिएल व्याट या सलामी जोडीने 96 धावांची भागीदारी केली. डॅनिएल व्याट 67 धावा करुन माघारी परतली. यानंतर स्मृतीने माइया बॉचियर, फ्रेया केम्प आणि क्लो ट्रायॉन यांच्यासह पार्टनरशीप करत स्कोअरकार्ड हलता ठेवला. या दरम्यान स्मृतीने अर्धशतक पूर्ण केलं.

मात्र दुसऱ्या बाजूने स्मृतीला अपेक्षित साथ मिळाली नाही. 96 धावांच्या सलामी भागीदारीनंतर वेल्श फायरने ठराविक अंतराने धक्के दिले. माइया बॉचियर 9, क्लो ट्रायॉन 8 आणि फ्रेया केम्प 2 रन्स करु माघारी परतली. स्मृतीने 42 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली. स्मृतीच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सदर्न ब्रेव्हने 100 बॉलमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावांपर्यंत मजल मारली.

स्मृतीचा दणका

वेल्श फायर वूमन्सकडून अॅलेक्स ग्रिफिथ्स हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हेली मॅथ्यूजच्या खात्यात 1 विकेट गेली.

सदर्न ब्रेव्ह वूमन्स प्लेईंग इलेव्हन | अन्या श्रबसोल (कॅप्टन), स्मृती मंधाना, डॅनिएल व्याट, माइया बॉचियर, फ्रेया केम्प, क्लो ट्रायॉन, जॉर्जिया अॅडम्स, मॅटलान ब्राउन, रिआना साउथबी (विकेटकीपर), कालिया मूर आणि मेरी टेलर.

वेल्श फायर वूमन्स प्लेईंग इलेव्हन | टॅमी ब्युमॉन्ट (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, सारा ब्राइस (विकेटकीपर), जॉर्जिया एल्विस, लॉरा हॅरिस, एमिली विंडसर, फ्रेया डेव्हिस, अॅलेक्स ग्रिफिथ्स, शबनिम इस्माईल, अॅलेक्स हार्टले आणि क्लेअर निकोलस.