Youth Olympics : यूथ ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटची मेजवानी! आयसीसीकडून एक पाऊल पुढे

| Updated on: Aug 17, 2024 | 4:03 PM

ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत क्रिकेटची भर पडल्याने आनंदाचं वातावरण आहे. जागतिक पातळीवर क्रिकेटला मोठं व्यासपीठ मिळणार आहे. असं असताना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी आणि आयओसीत एक डील होऊ शकते.

Youth Olympics : यूथ ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटची मेजवानी! आयसीसीकडून एक पाऊल पुढे
Follow us on

भारत सरकार युथ ऑलिम्पिक 2030 आणि 2036 ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आतापासून जोर लावला जात आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत ऑलिम्पिक समितीचं बैठक बोलावली होती. या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा ऑलिम्पिक खेळांकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 2036 ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाचा उल्लेख केला होता. त्यामुळे भारत सरकार स्पर्धेसाठी कसून तयारी करत असल्याचं दिसत आहे. भारताची इच्छाशक्ती पाहूनच आयसीसी आता एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटचा समावेश युवा ऑलिम्पिकमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यूथ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीत करार होऊ शकतो. दरम्यान, लॉस अँजेलिस 2028 ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेट असणार आहे. आता यूथ ऑलिम्पिक स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार आयसीसीचे जनरल मॅनेजर ऑफ डेव्हलपमेंट विल्यम ग्लेनराइट यांनी विवेक गोपालन नावाच्या व्यक्तीच्या ईमेलला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ग्लेनराइटने सांगितलं की, ‘ही चांगली आयडिया आहे. यात आम्ही लक्ष घालू शकतो.’ गोपालनचा ईमेल आणि ग्लेनराइटचं उत्तर एकत्रितपणे आयसीसी सीईओ ज्योफ एलार्डिस, वसीम खान, क्लेयर फर्लांग आणि ख्रिस टेटली यांना पाठवलं आहे. गोपालन यांनी युवा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. 2030 मध्ये युथ ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

क्रिकेटचा समावेश युथ ऑलिम्पिक स्पर्धेत व्हावा यासाठी आयसीसीला पाठवलेल्या मेलमध्ये काही उदाहरणंही दिली आहेत. यात सांगितलं आहे की, ‘रग्बी सेवन्ससहीत सर्व टॉप खेळ यूथ ऑलिम्पिकचा भाग आहे. मग क्रिकेट का नाही? युथ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर आणि तळागाळातील क्रिकेटमध्ये क्रांती होईल.’ क्रिकेटला आणखी एक व्यासपीठ मिळेल. ऑलिम्पिक स्पर्धेत 200 हून अधिक देश भाग घेतात. त्यामुळे क्रिकेटला आणखी चांगले दिवस येतील. खासकरून अमेरिका, युरोपियन देशात क्रिकेटची आवड निर्माण होईल.