दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया बी यांच्यात लढत सुरु आहे. या वेगवेगळ्या सामन्यात इंडिया सी आणि इंडिया ए संघ मजबूत स्थितीत आहे. या दोन्ही संघांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचं मुंबई इंडियन्सशी कनेक्शन आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्य ईशान किशन, तिलक वर्मा आणि अंशुल कंबोजने चांगली कामगिरी केली आहे. अनंतपूरमध्ये खेळल्या जामाऱ्या इंडिया ए विरुद्ध इंडिया डी संघात सामना होत आहे. इंडिया संघाने दुसरा डाव 380 धावांवर घोषित केला. तसेच इंडिया डी संघासमोर 488 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंडिया ए संघाची स्थिती मजबूत होण्यामागे तिलक वर्माचं खास योगदान राहिलं आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे इंडिया ए संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सीने आपल्या पहिल्या डावात 525 धावा केल्या. यात इशान किशनच्या शतकाचा समावेश आहे. याच सामन्यात इंडिया सीकडून खेळताना मध्यम गतीने गोलंदाजी करणाऱ्या अंशुल कंबोजने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने इंडिया बी संघाचे पाच गडी बाद केले.
अंशुल कंबोजला मुंबई इंडियन्स संघात अपेक्षित संधी मिळाली नाही. पण इंडिया सी संघाकडून खेळताना आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. इंडिया सीच्या नारायण जगदीशन, मुशीर खान, सरफराज खान, रिंकु सिंह आणि नीतीश रेड्डीची विकेट काढली. देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये या खेळाडूंचं मोठं नाव आहे. पण अंशुलच्या गोलंदाजीपुढे सर्व फिके पडले.
तिलक वर्माने 193 चेंडूत 111 धावा केल्या. यात 9 चौकारांचा समावेश होता. तिलक वर्माचं हे पाचवं फर्स्ट क्लास शतक आहे. दरम्यान, इंडिया ए संघ विजयाच्या उंबरठ्यावर असून इंडिया डी संघाला चौथ्या दिवशी 426 धावांचा गरज आहेत. हातात 9 विकेट असून ही धावसंख्या गाठणं कठीण आहे. दुसरीकडे, इंडिया बी आणि इंडिया सी सामना ड्रॉ होणार हे निश्चित झालं आहे. इंडिया ए संघाने विजय मिळवला तर सहा गुण होणार आहेत. दुसरीकडे इंडिया डी संघाच्या खात्यात 0 गुण असेल.