मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून आता स्पर्धा जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत. अशातच क्रिकेटच्या मैदानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ वर्ल्ड कपमधील नसून नेमका कोणत्या सामन्यादरम्यानचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर नाही आली.
Oh dear, what happened here? Forget about the running, how did the third batsman came on to the field? How many runs they ran? 😂 pic.twitter.com/0iMfGhp26e
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) November 14, 2023
एकाच वेळी मैदानात पाहून तुम्हाला आनंद झाला असेल. दोन बॅट्समन आधीच मैदानात असताना तिसरा खेळाडू कसा काय आतमध्ये दिसला. क्रिकेटमध्ये बेसिक रूल आहे, मैदानात एकावेळी दोनच खेळाडू बॅटींग करू शकतात. त्यामुळे व्हिडीओमध्ये दिसणारा तिसरा खेळाडू का धावत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमक्या किती धावा पळून काढल्या. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की स्ट्राईकला असलेला फलंदाज चेंडू टोलावतो त्यानंतर खाली उभा असलेला फलंदाजा वेगाने धाव घेण्यासाठी धावतो आणि वरती पोहोचतो. मात्र त्यावेळी बॉल मारलेल खेळाडू पडलेला दिसत आहे. काही सेकंदामध्ये तिसरा खेळाडू तिथे उभा असलेला पाहायला मिळतो. ता पडलेल्या खेळाडूला उठवत धावण्यासाठी सांगताना दिसत आहे. व्हिडीओ संपूर्ण पाहिल्यावर तरी लक्षात आलं का कोणता फलंदाज आऊट झाला?
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून सगळेच गोंधळात पडले आहेत कारण व्हिडीओ अनेकवेळा पाहूनही काहीच लक्षात आलं नाही. काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की रनर ठेवला असून दोघे पळाले अन फजिती उडालेली पाहायला मिळाली. मात्र ठामपणे कोणीच अद्याप याबाबत काही सांगू शकलं नाही.