मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 39 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. पण अफगाणिस्तानने या स्पर्धेत केलेले उलटफेर पाहता काहीही होऊ शकतं हे देखील खरं आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या दृष्टीने सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीचं सर्वच गणित विस्कटून जाईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान सामन्यात कोणते खेळाडू वरचढ ठरतील आणि पॉइंट्सचं गणित सोडवतील, त्याकडे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर संघाला धडाकेबाज सुरुवात करून देतो. तर मधल्या फळीत खेळत ग्लेन मॅक्सवेल कमाल करतो. त्यामुळे कोणाला कॅप्टन करावं आणि कोणाला संघात घ्यावं हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण त्या दिवशी कोण खेळेल हे देखील सांगणं कठीण आहे. त्यामुळे मागची आकडेवारी पाहून एक समीकरण बांधता येईल.
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाज आणि काही अंशी गोलंदाजांना मदत करणारी आहे. भारत श्रीलंका सामन्यात याची प्रचिती आली आहे. पहिल्या 10 ते 15 षटकात विकेट शाबूत ठेवल्या तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला 300 पार धावा करता येतील. त्यामुळे या मैदानात 300 पार धावा होऊ शकतात. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान 3 वेळा आमनेसामने आले आहेत. यात तिन्ही वेळा अफगाणिस्तानने बाजी मारली आहे.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅविस हेड, डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), कैमरून ग्रीन, मार्कस स्टोइनिश, पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेजलवुड
अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), अजमतुल्लाह ओमरजई, मोहम्मद नबी, इकरम अलीखिल (विकेटकीपर), राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी