मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 19 वा सामना नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अस्तित्वाचा प्रश्न आहे. श्रीलंकेने तीन पैकी तीन सामने गमावले असून अजूनही विजयाची प्रतिक्षा आहे. तर नेदरलँडने दिग्गज दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे हा विजय दोन्ही संघांपैकी एकासाठी संजीवनी ठरू शकतो. उत्तर प्रदेशच्या एकाना स्टेडियममध्ये हा सामना सकाळी 10.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघ यापूर्वी कधीच एकमेकांसमोर उभे ठाकले नव्हते. त्यामुळे या दोन्ही संघातील हा पहिलाच सामना असेल. पण पात्रता फेरीत या दोन्ही संघांची लढत झाली होती. श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले होते.
लखनऊच्या एकाना स्टेडियम परिसरातील वातावरण एकदम उष्ण असेल. पण दिवस मावळताना वातावरणात गारवा असेल. तापमाना 18 ते 31 अंश सेल्सियसच्या दरम्यान असेल. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळेल. पण खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल. त्यामुळे या स्थितीचा फायदा दोन्ही संघ घेतील आणि त्या पद्धतीने प्लेइंग इलेव्हन निवडतील. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाऊ शकते. आता हे त्या त्या संघाच्या रणनितीवर अवलंबून असेल.
नेदरलँड: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, लाहिरु कुमारा, मथीशा पाथिराना.