टी20 वर्ल्डकप संघात निवड झाल्यानंतर या खेळाडूंचा खेळ बिघडला! आकडेवारी पाहून तुम्हीच काय ते ठरवा

| Updated on: May 03, 2024 | 3:46 PM

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे. एकंदरीत अमेरिका वेस्ट इंडिजमधलं वातावरण, फॉर्मेटची समज आणि फॉर्म या निकषावर बहुतांश खेळाडूंची निवड केली आहे. काही खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी गृहीत धरली आहे. असं असताना 15 पैकी 8 खेळाडू निवडीनंतर सपशेल फेल ठरले आहेत.

टी20 वर्ल्डकप संघात निवड झाल्यानंतर या खेळाडूंचा खेळ बिघडला! आकडेवारी पाहून तुम्हीच काय ते ठरवा
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. गेल्या 11 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्यासाठी मोर्चेबांधणी केली. त्या दृष्टीने बीसीसीआय निवड समितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये चांगल्या कामगिरीची या खेळाडूंकडून अपेक्षा आहे.पण निवड होताच त्यानंतरच्या आयपीएल सामन्यात या खेळाडूंना क्रीडाप्रेमींची निराशा केली आहे. आकडेवारी पाहता तुम्हीही तसंच म्हणाल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 पैकी एकूण 8 खेळाडू सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलं आहे. निवडीनंतर कामगिरीत सुधारणा होण्याऐवजी भलतंच घडलं आहे. याची सुरुवात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यापासूनच करता येईल. टीम इंडियाचा कर्णधार कमकुवत होत असल्याचं दिसत आहे. टी20 वर्ल्डकप संघाचं नेतृत्व हाती असताना आणि संघाची घोषणा झाल्यानंतर रोहित शर्माने 5 चेंडूत फक्त 4 धावा केल्या आहेत. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होता.

टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचाही यात समावेश आहे. टी20 वर्ल्डकप संघात निवडल्यानंतर त्याची कामगिरी निराशाजनक आहे. निवड झाल्यानंतर पुढच्याच सामन्यात हार्दिक फ्लॉप ठरला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने नकोशी कामगिरी केली. यात पहिल्याच चेंडूवर खातं न खोलता तंबूत परतला. सूर्यकुमार चौथ्या क्रमांकासाठी दावेदार आहे. मात्र निवड झाल्यानंतरही त्याच्या कामगिरीत हवी तशी सुधारणा झालेली नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध फक्त 10 धावा करून तंबूत परतला.

निवड समितीने शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग यांच्यावरही विश्वास दाखवला आहे. मात्र त्यांचही प्रदर्शन काही खास ठरलं नाही. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिवम दुबेला आपलं खातंही खोलता आलं नाही. रवींद्र जडेजा फक्त 2 धावा करून तंबूत परतला. तर अर्शदीप सिंहने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 4 षटकात 52 धावा दिल्या. संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहलही काही खास करू शकले नाहीत. निवड समितीने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पण निवडीच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल फेल ठरले. संजू सॅमसन 3 चेंडूंचा सामना करत शून्यावर बाद झाला. तर युझवेंद्र चहलने एकही विकेट न घेता 4 षटकात 62 धावा दिल्या.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.. राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.