हे खेळाडू कधी चर्चेतही नव्हते, टी-20 विश्वचषकात बीसीसीआयनं दिली संधी

| Updated on: Sep 12, 2022 | 7:32 PM

विश्वचषक संघातील कार्तिकचं देखील अचानक आगमन झालंय. हा उजव्या हाताचा फलंदाज 2019 विश्वचषक उपांत्य फेरीपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. कार्तिक इंग्लंडमध्ये समालोचनही करत होता. याविषयी अधिक जाणून घ्या...

हे खेळाडू कधी चर्चेतही नव्हते, टी-20 विश्वचषकात बीसीसीआयनं दिली संधी
टी-20 विश्वचषक
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2022) क्रिकेटप्रेमी आता वाट पाहतायत. यासाठी आता टीम इंडियाची (Team India) घोषणा देखील करण्यात आली आहे. बीसीसीआयनं (BCCI) आज संघ जाहीर केल्यानं कुणाला वगळलं आणि कुणाला संधी दिली, याचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना मिळालं आहे.दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अत्यंत शक्तिशाली संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादवसारखे स्फोटक फलंदाज आहेत. जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाजही फीट झाल्यानं संघात पुन्हा आला आहे. टीम इंडियात बहुतेक खेळाडूंचं स्थान निश्चित झालं होते. पण, असे चार खेळाडू आहेत जे या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत संघात प्रवेशाचे दावेदार नव्हते, त्यांच्या नावाची चर्चा देखील नव्हती. पण, त्यांचं नाव अचानक समोर आलंय. तर त्यांची टी-20 विश्वचषकासाठी निवड देखील झाली आहे.

बीसीसीआयचं ट्विट

दीपक हुड्डा

दीपक हुड्डाचा टी-20 विश्वचषक अचानक प्रवेश झालाय. या वर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेत त्याला संधी मिळाली. त्याने 21 धावा केल्या. यानंतर हुड्डाला आयर्लंडला नेण्यात आले जेथे त्याने तिसऱ्या टी-20 डावात शतक झळकावलं. केवळ 9 टी-20 डाव खेळणाऱ्या या खेळाडूची आता टी-20 विश्वचषक संघात निवड झालीय.

अर्शदीप सिंग

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचंही नाव अचानक समोर आलयं. याची चर्चा देखील नव्हती. अर्शदीपला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळेल, असं वाटलंही नव्हतं. यानं 3 महिन्यांपूर्वी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हे असंच एक नाव आहे. पाठीच्या दुखापतीशी झुंजणारा हा खेळाडू खराब तंदुरुस्ती आणि फलंदाजीमुळे 2021 च्या विश्वचषकापासून टीम इंडियातून बाहेर होता. यानंतर हार्दिकनं त्याच्या फिटनेसवर काम केलं. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे कर्णधारपद मिळालं. पंड्याने आयपीएल 2022 मध्ये 15 सामन्यांमध्ये 44 पेक्षा जास्त सरासरीने 487 धावा केल्या आणि 8 बळीही घेतले. हार्दिक पांड्यानं आपल्या संघाला चॅम्पियन बनवले आणि त्यानंतर हा खेळाडू संघात परतला. त्याच्या पुनरागमनानंतर पांड्याने वर्चस्व गाजवले आणि आता त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताचे ट्रम्प कार्ड म्हणून पाहिलं जातंय.

दिनेश कार्तिक

विश्वचषक संघातील कार्तिकचं देखील अचानक आगमन झालंय. हा उजव्या हाताचा फलंदाज 2019 विश्वचषक उपांत्य फेरीपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. कार्तिक इंग्लंडमध्ये समालोचनही करत होता. आयपीएल 2022 च्या हंगामानं त्याचं नशीब बदललं. कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये 55 च्या सरासरीने 330 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 180 पेक्षा जास्त होता आणि या दमदार कामगिरीनंतर कार्तिकने टीम इंडियात प्रवेश केला आणि आता त्याची टी-20 वर्ल्ड कप संघात निवड झाली.