“ते फक्त बसून होते आणि पहिल्या दिवसापासून..”, सूर्या मालिका विजयानंतर कुणाबद्दल म्हणाला?

| Updated on: Nov 16, 2024 | 11:11 AM

Suryakumar Yadav SA vs IND 4th T20i : संजूच्या डोक्यात ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दिवसापासूनच सर्व काही होतं. संजूने या मालिकेतील शेवटच्या दिवशी मनात असलेलं सर्वकाही बोलून टाकलं.

ते फक्त बसून होते आणि पहिल्या दिवसापासून.., सूर्या मालिका विजयानंतर कुणाबद्दल म्हणाला?
suryakumar yadav sa vs ind 4th t20i post match
Follow us on

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 135 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली. तर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. तिलक आणि संजू या दोघांनी नाबाद शतक करत टीम इंडियाला 283 धावांपर्यंत पोहचवलं. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची भूमिचा चोखपणे पार पाडली आणि दक्षिण आफ्रिकेला 18.2 ओव्हरमध्ये 148 धावांवर गुंडाळलं आणि मालिका जिंकली. आम्ही निकालाची चिंता केली नाही, आम्ही सवयीनुसार खेळलो, असं सूर्याने म्हटलं. तसेच सूर्या कोचिंग आणि सपोर्ट स्टाफबाबत सर्वांसमोर स्पष्टच म्हणाला.

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या कोचिंग आणि सपोर्ट स्टाफने हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. सूर्याला सामन्यानंतर याबाबत विचारण्यात आलं. यावर सूर्याने त्याच्या डोक्यात पहिल्या दिवसापासून ते मालिकेच्या शेवटच्या सामन्यापर्यंत असलेलं सर्वकाही बोलून टाकलं.

“ते फक्त बसून होते आणि पहिल्या दिवसापासून खेळाचा आनंद घेत होते. त्यांनी खेळाडूंसह चर्चा केली आणि तुमच्या पद्धतीनेच खेळ होउ द्या, असं म्हटलं. तसंच आजही तुम्हाला हवं ते करा अशी मुभा होती. टॉस जिंकून बॅटिंग करायचीय, तर तसं करा”, असं सूर्याने सामन्यानंतर म्हटलं.

संजू-तिलकचा शतकी दणका

दरम्यान टॉस जिंकून टीम इंडियाने बॅटिंगचा निर्णय केला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी 73 धावांची भागीदारी केली. अभिषेक 36 धावा करुन बाद झाला. त्यानंतर संजू आणि तिलक वर्मा या दोघांनी वैयक्तिक शतक झळकावत टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली. संजू आणि तिलक या दोघांनी प्रत्येकी नाबाद 109 आणि 120 धावा केल्या. तिलकचं हे सलग आणि दुसरं शतक ठरलं. तर संजूचं हे गेल्या 35 दिवसांमधील तिसरं शतक ठरलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.