टी20 वर्ल्डकपसाठी ही आहे टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग 11! या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

| Updated on: Apr 30, 2024 | 9:53 PM

आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने कूच करत आहे. प्लेऑफचं गणित आता हळूहळू सुटताना दिसत आहे. असं असताना टी20 वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. बीसीसीआयने टी20 वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र यातील चार खेळाडूंना प्लेइंग बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी ही आहे टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग 11! या खेळाडूंना संधी मिळणं कठीण
Follow us on

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात हा संघ अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. टीम इंडियात 15 खेळाडू असलेत तरी यापैकी बेस्ट प्लेइंग 11ची आतापासून चर्चा रंगली आहे. रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल मैदानात ओपनिंगला उतरेल यात शंका नाही. या दोघांनी ओपनिंग करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. तसेच अनेकदा संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जयस्वालचं स्थान पक्कं आहे. या कॉम्बिनेशनला सध्या तरी हात लावला जाणार नाही. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवला पसंती मिळेल. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत विकेटकीपर बॅट्समन म्हणून उतरेल. सध्यातरी विकेटकीपर बॅट्समन म्हणून ऋषभ पंतला पसंती मिळत आहे.

अष्टपैलूच्या फळीत पहिलं स्थान हार्दिक पांड्याला मिळेल. हार्दिककडे उपकर्णधारपदही आहे. तर रवींद्र जडेजा हा दुसरा अष्टपैलू खेळाडू असेल. दुसरीकडे अक्षर पटेललाही अष्टपैलू म्हणूनच गणलं जाईल. जेणेकरून टीम इंडियाच्या बॅटिंगची खोली आणखी वाढेल. फिरकीपटूच्या ताफ्यात कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाजाची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपच्या खांद्यावर असेल. त्यामुळे संजू सॅमसन, युझवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळणं कठीण आहे. एखाद खेळाडू जखमी झाला तर मात्र संधी मिळू शकते. दुसरीकडे, शिवम दुबेला संघात संधी मिळेल की नाही याबाबत आता सांगणं खरंच खूप कठीण आहे. घेतलं तरी अक्षर पटेलची जागा घेऊ शकतो.

टीम इंडिया अ गटात असून या गटात पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध 5 जूनला असणार आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी लढत होणार आहे. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडासोबत लढत होणार आहे.  या गटातील टॉप 2 संघांना पुढच्या फेरीत संधी मिळेल.

टीम इंडियाची बेस्ट प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग/मोहम्मद सिराज.