मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) तिसरा सामना खेळणाऱ्या कोलकाता नाईड रायडर्सने शुक्रवारी शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी पंजाब किंग्सला सहा विकेटने नमवलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचे दोन हिरो होते. उमेश यादव आणि आंद्रे रसेल. उमेश यादवने भेदक गोलंदाजी करताना चार षटकात 23 धावा देत चार विकेट घेतल्या. त्यामुळे पंजाब किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव 137 धावात आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरची चार बाद 51 अशी स्थिती होती. पण आंद्रे रसेलने 31 चेंडून नाबाद 70 धावा फटकावत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केल. या खेळीत रसेलने दोन चौकार आणि आठ षटकार लगावले. उमेश आणि रसेल (Andre Russell) हे दोघे या सामन्याचे हिरो असले तरी केकेआरच्या अजून एका खेळाडूंना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तो खेळाडू म्हणजे टिम साऊदी (Tim Southee). साऊदीने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने 4 षटकात 36 धावा देत पंजाबचे दोन बळी टिपले. परंतु साऊदीने गोलंदाजीने लोकांचं लक्ष वेधलं नाही तर त्याच्या चपळ क्षेत्ररक्षणाने सर्वांची मनं जिंकली.
केकेआरचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना त्यांचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याचा झेल पाहून स्टँडमध्ये उभी असलेली अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही आश्चर्यचकित झाल्या आणि टाळ्या वाजवायला लागल्या.
ही घटना मॅचमधील पंजाब किंग्जच्या इनिंगदरम्यान 19 व्या षटकात घडली. पंजाबच्या संघाने 9 गडी गमावून 137 धावा केल्या होत्या. रसेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर कागिसो रबाडाने हवेत सरळ आणि लांब फटका लगावला. पण चेंडू फार लांब गेला नाही. लाँग ऑफकडून अजिंक्य रहाणे आणि लाँग ऑनकडून टीम साऊदी हा झेल घेण्यासाठी धावले. रहाणेला पोहोचेपर्यंत साऊदीने हवेत डायव्हिंग करत नेत्रदीपक झेल टिपला.
हा झेल रहाणेचा होता, असं समालोचक म्हणत होते. पण साऊदीने वेगात पोहोचून हा झेल घेतला. ही विकेट महत्त्वाची होती, कारण रबाडाने 15 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. सौदीचा झेल पाहून स्टँडवर बसलेल्या सुहाना खान आणि अनन्या पांडेही उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवू लागल्या. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Tim Southee ? #IPL2022 pic.twitter.com/2WiqXXtJWq
— Amanpreet Singh (@AmanPreet0207) April 1, 2022
इतर बातम्या
Shahrukh Khan on Andre Russell: आंद्रे रसेल नामक वादळावर शाहरुख खान खूश, म्हणाला, ‘बऱ्याच दिवसांनी…’
IPL 2022, MI vs RR Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल मुंबई विरुद्ध राजस्थान सामना