R Ashwin | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून वगळलं, आर अश्विन आता या टीमकडून खेळणार

| Updated on: Jun 14, 2023 | 5:12 PM

आर अश्विन याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातून वगळण्यात आलं होतं. आर अश्विनल याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

R Ashwin | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून वगळलं, आर अश्विन आता या टीमकडून खेळणार
Follow us on

तामिळनाडू | टीम इंडियाचा अनुभवी आणि ऑलराउंडर आक अश्विन याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून वगळण्यात आलं. टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा याच्यावर या निर्णयामुळे चांगलीच टीका करण्यात आली. अनेक आजी माजी खेळाडूंनी अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयावरुन नाराजी आणि हैराणी व्यक्त केली. टीम इंडियाला अश्विनला न खेळवणं चांगलंच महागात पडलं. आता आर अश्विनने मोठा निर्णय घेतलाय. अश्विन आता आजपासून नव्या क्रिकेट टीमकडून खेळताना दिसणार आहे. अश्विनचा नव्या टीमच्या जर्सीतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोईंबटूरमध्ये 12 जूनपासून तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेला सुरुवात झालीय. या स्पर्धेत आज डींडीगूल ड्रॅग्न विरुद्ध Ba11sy Trichy या संघात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. आर अश्विन डींडीगूल ड्रॅग्न टीमकडून खेळणार आहे. आर अश्विन व्यतिरिक्त या टीममध्ये टीम इंडियाच्या वरुण चक्रवर्थी याचाही समावेश आहे.

आर अश्विन या टीमकडून खेळणार

दरम्यान टीम इंडिया आता विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया वेस्टइंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मात्र तोवर टीम इंडियाला विश्रांतीच आहे. या दरम्यानच्या काळात मोकळ्या वेळेत अश्विन टीएनपीएल स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे अश्विन आयपीएलनंतर टीएनपीएल या स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याकेड क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

डिंडीगुल ड्रॅगन्स टीम | बाबा इंद्रजित (कॅप्टन आणि विकेटकीपर), एस अरुण, हेमंथ कुमार, विमल खुमर, बूपती कुमार, आदित्य गणेश, एमई तमिळ धिलीपन, अफान खादर, रोहन भुत्रा, सी सरथ कुमार, पी विघ्नेश, आर अश्विन, व्हीपी दिरान, जी किशोर , एम मथिवन्नन, वरुण चक्रवर्थी, पी सर्वणा कुमार, अद्वेथ शर्मा, शिवम सिंह आणि सुबोथ भाटी.

Ba11sy Trichy टीम | गंगा श्रीधर राजू (कॅप्टन), मणि भारती (विकेटकीपर), डॅरिल फेरारियो, जाफर जमाल, पी फ्रान्सिस रोकिन्स, अक्षय श्रीनिवासन, टी सरन, के इसवरन, एम शजहान, आर राजकुमार, एसपी विनोद, जी गोडसन, कारापरंबिल मोनीश, अँटोनी धस, आर अलेक्झांडर, टी नटराजन, व्ही अथिसायराज डेव्हिडसन, आर सिलम्बरासन, कार्तिक षणमुगम आणि के मोहम्मद अजीम.