स्टार ऑलराउंडर आर अश्विन हा गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियापासून दूर आहे. अश्विनची टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतही निवड करण्यात आली नाही. त्यामुळे अश्विन आता श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरिजमधून कमबॅक करण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी अश्विने मोठा कारनामा केला आहे. अश्विनने टीम इंडियाकडून आणि आयपीएलमध्ये खेळताना दमदार बॅटिंग केली आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये शतकंही ठोकली आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना टीएनपीएल 2024 स्पर्धेत अश्विनचा नवा अवतार पाहायला मिळाला आहे. तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत कॅप्टन अश्विनने ओपनिंगला येत विस्फोटक बॅटिंग केली आहे. अश्विनच्या या तोडू खेळीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीएनपीएल 2024 स्पर्धेत रविवारी 14 जुलै रोजी चेपॉक सुपर गिल्लीस विरुद्ध दिंडीगुल ड्रगन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेपॉक टीमने टॉस जिंकून डीडीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन आर अश्विन आणि शिवम सिंह ही सलामी जोडी मैदानात आली. कॅप्टन अश्विनने या 7 षटकांच्या सामन्यात अवघ्या 20 बॉलमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 45 धावांची विस्फोटक खेळी केली. अश्विनने 225 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 45 धावांची खेळी केली. अश्विनच्या या खेळीच्या जोरावर डीडीला 7 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 64 धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान सीएसजीने विजयासाठी मिळालेलं 65 धावांचं आव्हान हे 13 बॉलआधी 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. सीएसजीने 4.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. एन जगदीशन याने 14 बॉलमध्ये नॉट आऊट 32 रन्स केल्या. तर बाबा अपराजित याने 14 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. अश्विनला आपल्या नेतृत्वात टीमला विजय मिळवून देता आला नाही, मात्र त्याने आपण कोणत्याही स्थानी बॅटिंग करु शकतो हे सिद्ध केलं. तसेच आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी आपला दावा मजबूत केला आहे.
आर अश्विनची विस्फोटक बॅटिंग
Captain. Opener. Top Scorer. 😎
Ash Anna scored a thunderous 45* while the 7 other batters combined for just 21. MASS! 🔥#TNPLonFanCode @ashwinravi99 pic.twitter.com/RWac8GL60y
— FanCode (@FanCode) July 15, 2024
डिंडीगुल ड्रॅगन्स प्लेइंग ईलेव्हन: रवीचंद्रन अश्विन (कॅप्टन), शिवम सिंग, विमल खुमर, बाबा इंद्रजित (विकेटकीपर), बूपती कुमार, सी सरथ कुमार, एस दिनेश राज, सुबोथ भाटी, वरुण चक्रवर्ती, पी विघ्नेश आणि व्हीपी दिरान.
चेपॉक सुपर गिलीज प्लेइंग ईलेव्हन: बाबा अपराजित (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष रंजन पॉल, डॅरिल फेरारियो, आंद्रे सिद्धार्थ सी, जितेंद्र कुमार, अभिषेक तन्वर, अश्विन क्रिस्ट, राहिल शाह, बाळू सूर्या आणि गणेशन पेरियास्वामी.