मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी काही दिवस आती बाकी आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएआधी दोन मोठेो उलटफेर पाहायला मिळाले. त्यातील एक म्हणजे ट्रेडिंग विन्डोमध्ये हार्दिक पंड्या याला मुंबईने आपल्या ताफ्यात घेतलं. आता तो यंदाच्या मोसमामध्ये कर्णधार असणार आहे. तर दुसरीकडे सनरायजर्स संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्स याची निवड करण्यात आलीये.
डिसेंबर महिन्यात झालेल्या लिलावामध्ये हैदराबाद संघाने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. आता त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावरून टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि समालोचक इरफान पठाण याने नाराजी व्यक्त केली आहे.
कमिन्स याने दमदार कामगिरी करत आहे, आताच झालेला वन डे वर्ल्ड कमिन्स याने आपल्या नेतृत्त्वाखाली जिंकून दिला. पण त्याने टी-20 फॉरमॅटमधील त्याची कामगिरी पाहिली तर फारशी काही चांगली नाही. आयपीएलमध्येही पाहिलं तर त्याची कामगिरी फारशी काही चांगली नाही. त्यामुळे कमिन्सला कॅप्टन बनवण्याचा निर्यण हैदराबाद टीम मॅनेजमेंटसाठी आव्हान असणार आहे. बरं कमिन्सला कॅप्टन केलंं मग एडन माार्करम याचं काय होणार? त्याला काय फक्त एकाच सीझनसाठी कॅप्टन करण्यात आलं होतं आणि आता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं इरफान पठाण याने म्हटलं आहे.
दरम्यान, पॅट कमिन्स याच्या नेतृत्त्वाखाली 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाला पराभूत करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. तर त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही फायनलमध्ये टीम इंडियालाच पराभूत केलं होतं. टीम इंडिया दोन्ही पराभव कधीच विसरू शकणार नाही. कारण हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलिया संघाने काढून घेतला होता.
सनरायजर्स हैदराबाद आयपीएल फायनल संंघ 2024 :- पॅट कमिन्स (कर्णधार) अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्र सिंग यादव, उमरान मलिक, नायक. नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.