Asia Cup 2023 पूर्वी बीसीसीआयला डीपी बदलणं पडलं महागात, ट्विटरने केलं असं काही..

| Updated on: Aug 13, 2023 | 11:20 PM

बीसीसीआयने आपला डीपी बदलल्याने ट्विटर एक्शन घेतली आहे. ब्लू टिक काढल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

Asia Cup 2023 पूर्वी बीसीसीआयला डीपी बदलणं पडलं महागात, ट्विटरने केलं असं काही..
बीसीसीआयने आपला डीपी बदलताच ट्विटर एक्शन मोडमध्ये, केली अशी कारवाई
Follow us on

मुंबई : आशिया कप 2023 पूर्वी बीसीसीआयला आपल्या ट्विटर खात्याचा डीपी बदलणं चांगलंच महागात पडलं आहे. बीसीसीआयने 13 ऑगस्टला दुपारी आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि आपल्या अधिकृत लोगोऐवजी भारतीय ध्वज असलेला तिरंगा लावला. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून बीसीसीआने डीपीवर भारतीय तिरंगा लावला आहे. पण ट्विटरने कारवाई करत बीसीसीआयचं ब्लू टिक काढलं आहे. ट्विटरच्या नव्या नियमांनुसार प्रोफाईल फोटो बदलल्यानंतर युजर्सचं ब्लू टिक हटवलं जातं. या कारणामुळे ब्लू टिक हटवल्याचं बोललं जात आहे. ब्लू टिक सोशल मीडियावर अधिकृत खातं असल्याचं दर्शवतं. मात्र एक्स ट्विटरने मागच्या काही दिवसात पॉलिसीमध्ये अपडेट केले आहेत. त्याचा फटका आता बीसीसीआयला बसला आहे.

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रत्येक घरावर तिरंगा’ या अभियानाअंतर्गत देशवासियांना आवाहन केलं आहे. सोशल मीडिया प्रोफाइलवर भारतीय ध्वज लावण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसानंतर भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिनाचं औचित्य साधत बीसीसीआने मेन, वूमन्स आणि देशांतर्गत क्रिकेटच्या अधिकृत खात्यांवरील फोटो बदलला आहे. तिन्ही जागी बीसीसीआने तिरंगा लावला आहे. यामुळे तिन्ही हँडल्सवरील ब्लू टिक हटवण्यात आलं आहे.

काय आहे ब्लू टिक हटवण्याचा नियम?

नव्या पॉलिसीनुसार ईमेल एड्रेस किंवा मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर ब्लू टिक हटवलं जातं. युजर्स आपलं प्रोफाईलवरील नाव किंवा प्रोफाईल फोटो बदलल्यास त्यांचं ब्लू टिक काढलं जातं. त्याचबरोबर सहा महिन्यांपासून जर ट्विटर अॅक्टिव्ह नसेल तर ब्लू टिक हटवलं जातं.

सरकार, ब्रँड किंवा प्रसिद्ध व्यक्तींना यापूर्वी ब्लू टिक मिळत होतं. पण गेल्या काही दिवसात एक्स ट्विटरने ब्लू टिकसाठी पैसे ठेवले आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागतात. त्यामुळे सोशल मीडियावर कोणीही पैसे भरून ब्लू टिक खरेदी करू शकतं. त्यामुळे ब्लू टिकची किंमत कमी झाली आहे. फेसबुकवर आताही कलाकार आणि स्पोर्ट्समन यांना पैसे न भरता ब्लू टिक मिळतं.