दुबई | अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशने यूएईला विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 282 धावा केल्या. बांगलादेशकडून आशिकुर शिबली याने संयमी शतकी खेळी केली. तर चौधरी एमडी रिझवान आणि अरिफूल इस्लाम या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. या तिघांच्या खेळीमुळेच बांगलादेशला 250 पार जाता आलं. बांगलादेशच्या फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. आता पाळी ही गोलंदाजांची आहे. बांगलागेशचे गोलंदाज यूएईसमोर कशाप्रकारे बॉलिंग करतात, याकडे लक्ष असणार आहे.
यूएईने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशने या निर्णयाचा चांगलाच फायदा घेतला. बांगलादेशकडून आशिकुर याने शतक तर चौधरी एमडी रीझवान आणि अरिफल इस्लाम या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. आशिकुर याने 149 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. चौधरी रिझवान याने 71 चेंडूत 60 धावांचं योगदान दिलं. तर अरिफुल इस्लाम 40 बॉलमध्ये 50 धावा करुन माघारी परतला. तर कॅप्टन महफुझुर रब्बी याने याने 21 धावा जोडल्या. या चौघांशिवाय इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
यूएईकडून अयमान अहमद याने 4 विकेट्स घेतल्या. ओमिद रहमान याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पै आणि ध्रुव पराशर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
बांगलादेशचा आशिकुरल रहमान शिबली चमकला
ACC Men’s U19 Asia Cup 2023
Bangladesh U19 Vs UAE U19 | FinalUAE U19 need 283 Runs to win
Photo Credit: CREIMAS Photography#BCB | #Cricket | #U19 | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/QQDD4fsjna
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 17, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मो. रिझवान, अरिफुल इस्लाम, मोहम्मद शिहाब जेम्स, अहरार अमीन, परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मो. इक्बाल हुसेन एमोन आणि मारुफ मृधा.
यूएई प्लेईंग ईलेव्हन | अयान अफझल खान (कर्णधार), आर्यांश शर्मा (विकेटकीपर), अक्षत राय, तनिश सुरी, ध्रुव पराशर, एथन डीसूझा, यायिन राय, अम्मर बदामी, हार्दिक पै, अयमान अहमद आणि ओमिद रहमान.