IND vs BAN Final : इंडिया विरुद्ध बांगलादेश महाअंतिम सामना, पंत-हार्दिककडे साऱ्यांचं लक्ष

| Updated on: Dec 08, 2024 | 1:51 AM

India vs Bangladsh U 19 Asia Cup Final 2024 Live Streaming : आशिया चॅम्पियन होण्यासाठी रविवारी टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

IND vs BAN Final : इंडिया विरुद्ध बांगलादेश महाअंतिम सामना, पंत-हार्दिककडे साऱ्यांचं लक्ष
india vs bangaldesh u 19 asia cup final
Follow us on

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीतील सामने पार पडले आहेत. आता आशिया कप ट्रॉफी कोण उंचावणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. गतविजेता बांगलादेश आणि टीम इंडिया अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहे. बांगलादेशची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. बांगलादेशने गेल्या वेळेस यूएईला अंतिम फेरीत पराभूत करत आशिया कप जिंकला होता. तर उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाकडे यंदा उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा घेत बांगलादेशला सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्यापासून रोखण्याची संधी आहे.

टीम इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंकेला लोळवत फायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता या दोन्ही संघाच्या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. मोहम्मद अजीजुल हकीम तमीम हा बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद अमान याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे.

उभयसंघातील अंतिम सामन्याला रविवारी 8 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजता टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपवरुन हा सामना लाईव्ह पाहता येईल.

कोण होणार आशिया चॅम्पियन?

बांग्लादेश अंडर 19 टीम : मोहम्मद अजीजुल हकीम तमीम (कॅप्टन), मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), जवाद अबरार, कलाम सिद्दीकी अलीन, मोहम्मद शिहाब जेम्स, देबाशीष सरकार देबा, मोहम्मद रफी उज्जमान रफी, मोहम्मद समियुन बसीर रतुल, मारुफ मृधा, अल फहद, इकबाल हुसैन इमोन, एमडी रिजान हुसैन, अशरफुज्जमां बोरेनो, एमडी रिफत बेग आणि साद इस्लाम रजीन.

अंडर 19 टीम इंडिया : मोहम्मद अमान (कर्णधार), हरवंश सिंह (विकेटकीपर), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्दार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, किरण चोरमाले, हार्दिक राज, चेतन शर्मा, युद्धजीत गुहा, अनुराग कवाडे, समर्थ नागराज, मोहम्मद एनान आणि प्रणव पंत.