अंडर 19 आशिय कप 2024 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध गतविजेता बांगलादेश आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 10 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन मोहम्मद अमान याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर मॅच पाहता येईल.
टीम इंडियाने उपांत्य फेरीत श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर गतविजेत्या बांगलादेशने श्रीलंकेचा धुव्वा उडवत फायनलचं तिकीट मिळवलं होतं. त्यानंतर भारत-बांगलादेश आमनेसामने आले आहेत. गतविजेत्या बांगलादेशने गेल्या वर्षी उपांत्य फेरीत टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाकडे आशिया कप ट्रॉफी जिंकत उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा घेण्याची सुवर्णसंधी आहे. आता टीम इंडियाची ही पलटण अंतिम सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाने साखळी फेरीत पराभवाने सुरुवात केली. पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केलं. मात्र त्यानंतर जपान आणि यूएईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने साखळी फेरीत अफगाणिस्तान आणि नेपाळला पराभूत करत सलग 2 विजय मिळवले. मात्र तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केलं. मात्र पहिले 2 सामने जिंकले असल्याने बांगलादेशने उपांत्य फेरीतील तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे त्या पराभवामुळे तसा फरक पडला नाही.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्दार्थ सी, हरवंश सिंह (विकेटकीपर), केपी कार्तिकेय, निखिल कुमार, किरण चोरमाले, हार्दिक राज, चेतन शर्मा आणि युधाजीत गुहा.
बांग्लादेश प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अजीजुल हकीम तमीम (कॅप्टन), जवाद अब्रार, कलाम सिद्दीकी अलीन, मोहम्मद शिहाब जेम्स, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), देबाशीष सरकार देबा, मोहम्मद समियुन बसीर रतुल, मारुफ मृधा, मोहम्मद रिजान होसन, अल फहद आणि इकबाल हुसैन इमोन.