मोहम्मद अमान याच्या नेतृत्वात अखेर टीम इंडियाने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयाचं खातं उघडलं आहे. टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेच्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात जपानवर 211 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने जपानला 340 धावांचं आव्हान दिलं होतं. जपानने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा सामना करत पूर्ण 50 षटकं खेळून काढली. मात्र त्यांना 150 पारही पोहचता आलं नाही. जपानला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 128 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे हा सामना 211 धावांनी आपल्या नावावर केला. तर जपानचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
जपानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. जपानसाठी ह्यूगो केली याने सर्वाधिक धावा केल्या. ह्यूगो केली याने 111 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. चार्ल्स हिन्झे याने नाबाद 35 धावा केल्या. तर निहार परमान याने 14 धावा केल्या. तर इतर फलंदाज टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर ढेर झाले. टीम इंडियाकडून हार्दिक राज याने सर्वात चिवट बॉलिंग टाकली. हार्दिकने 8 पैकी 2 ओव्हर मेडन टाकल्या. तर फक्त 9 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. चेतन शर्मा आणि केपी कार्तिकेय या दोघांनीही प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर युद्धजित गुहा याने 1 विकेट मिळवली.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने कॅप्टन मोहम्मद अमान याचं शतक तर आयुष म्हात्रे आणि केपी कार्तिकेय या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 300 पार मजल मारली.तसेच इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये विकेट्स गमावून 339 रन्स केल्या. कॅप्टन मोहम्मद अमान याने सर्वाधिक 122 धावा केल्या. तर केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे या दोघांनी अनुक्रमे 57 आणि 54 धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडली. जपानकडून काझुमा काटो-स्टाफोर्ड आणि ह्यूगो केली या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आरव तिवारी आणि चार्ल्स हिन्झे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
शतक करणारा कॅप्टन मोहम्मद अमान ‘मॅन ऑफ द मॅच’
For his fantastic 💯 and steering India U19 to their first win in the #ACCMensU19AsiaCup, Mohammad Amaan is awarded the Player of the Match 🏆
Scorecard ▶️ https://t.co/Aa4ib6AsK0#TeamIndia | #ACC pic.twitter.com/pszhMjfIan
— BCCI (@BCCI) December 2, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, निखिल कुमार, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, युद्धजित गुहा आणि चेतन शर्मा.
जपान इंडिया प्लेइंग ईलेव्हन : कोजी हार्डग्रेव्ह आबे (कर्णधार), आदित्य फडके, निहार परमार, काझुमा काटो-स्टाफोर्ड, चार्ल्स हिन्झे, ह्यूगो केली, टिमोथी मूर, किफर यामामोटो-लेक, डॅनियल पँकहर्स्ट (विकेटकीपर), आरव तिवारी आणि मॅक्स योनेकावा लिन.