अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानने अप्रतिम सुरुवात केली आहे. पाकिस्तानने टीम इंडियासमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा केल्या. पाकिस्तानसाठी शाहजेब खान याने सर्वाधिक 159 धावांची खेळी केली. तर उस्मान खान याने 60 धावा केल्या. तर मोहम्मद रियाझउल्लाह याने 27 धावांचं योगदान दिलं. मात्र या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. आता पाकिस्तानचे गोलंदाज या आव्हानाचा यशस्वी बचाव करणार की टीम इंडिया विजयी सलामी देणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
कॅप्टन मोहम्मद अमान याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टनचा निर्णय पाकिस्तान टीमने योग्य ठरवला. उस्मान खान आणि शाहझेब खान या सलामी जोडीने 160 धावांची अप्रतिम भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला 121 धावांच्या मोबदल्यात 6 झटके देत 281 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही.
शाहझेब खान आणि उस्मान खान या सलामी जोडी व्यतिरिक्त कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. शाहझेबने 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 159 धावा केल्या. तर उस्मानने 94 बॉलमध्ये 6 फोरसह 60 रन्स केल्या. रियाझउल्लाहने 33 चेंडूत 27 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाकडून समर्थ नागराज याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आयुष म्हात्रे याने पाकिस्तानला पहिले 2 झटके देत टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करुन देण्यात मदत केली. तर युधजित गुहा आणि किरन चोरमले या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
भारतासमोर 282 धावांचं आव्हान
Shahzaib Khan’s superb 159 featuring 1️⃣0️⃣ sixes lifts Pakistan U19 to 281-7 🏏#PAKvIND | #PakistanFutureStars | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/AJbwiWDXWo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 30, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.