पाकिस्तान क्रिकेट टीमने अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियावर 43 धावांनी मात करत महामुकाबला जिंकला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाचा डाव हा 47.1 ओव्हरमध्ये 238 धावांवर आटोपला. पाकिस्तानचा हा टीम इंडिया विरुद्धचा अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील 7 सामन्यांमधील पाचवा विजय ठरला.
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र या दोघांना अपेक्षांवर खरं उतरता आलं नाही. आयुष म्हात्रे 20 धावांवर माघारी परतला. तर वैभव 1 धाव करुन बाद झाला. तसेच बहुतांश फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र निखील कुमार याचा अपवाद वगळता इतर कुणालाही चांगली खेळी करता आली नाही. निखील कुमार याने सर्वाधिक 67 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस मोहम्मद एनॉन आणि, हरवंश सिंह आणि किरण चोरमले या तिघांनी चिवट खेळी करत भारताच्या पराभवातील अंतर कमी केलं.
मोहम्मद एनॉन आणि, हरवंश सिंह आणि किरण चोरमले या त्रिकुटाने अनुक्रमे 30,26 आणि 20 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 16 धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. पाकिस्तानकडून अली रझा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अब्दुल सुभान आणि फरहान उल हक या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर उस्मान खान याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान पाकिस्तानने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून शाहजेब खान आणि उस्मान खान या जोडीने केलेल्या शतकी-अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 281 धावा केल्या. शाहजेब खान याने सर्वाधिक 159 धावा केल्या. तर उस्मान खान याने 60 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या दोघांना आऊट केल्यानंतर पाकिस्तानला झटपट धक्के दिले आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. टीम इंडियाकडून समर्थ नागराज याने 3 विकेट्स घेतल्या. आयुष म्हात्रे याने दोघांना बाद केलं. तर युधजित गुहा आणि किरण चोरमले या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया विजयी सुरुवात करण्यात अपयशी
India U19 put a solid fight but lose the match.
The team will look to bounce back in their next match 💪 #TeamIndia | #ACC | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/NwFLloJJm9
— BCCI (@BCCI) November 30, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, हरवंश सिंग (विकेटकीपर), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद इनान, समर्थ नागराज आणि युधाजित गुहा.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : साद बेग (कर्णधार आणि विकेटकीपर), शाहजेब खान, उस्मान खान, फरहान युसफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अर्शद, अब्दुल सुभान, अली रझा, उमर झैब आणि नावेद अहमद खान.